Home Breaking News Chandrapur city@ news • चंद्रपूरच्या प्रशिल अंबादेने रचला एक नविन इतिहास

Chandrapur city@ news • चंद्रपूरच्या प्रशिल अंबादेने रचला एक नविन इतिहास

152

Chandrapur city@ news
• चंद्रपूरच्या प्रशिल अंबादेने रचला एक नविन इतिहास

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:चंद्रपूरच्या इंदिरा नगर मधील प्रशिल जयदेव अंबादे यांनी जगातील सर्वात उंच शिखर (स्टॅंड अलोन माऊंटेन – stand alone mountain) नुकताच सर केला आहे.जो दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो (Kilimanjaro) ज्याची उंची समुद्र सपाटी पासून ५८९५ मीटर एव्हढी आहे. माऊंट किलीमांजारो सर करणारा प्रशिल जयदेव अंबादे हा विदर्भातील पहिला ठरला आहे.
विशेष म्हणजे
प्रशिल हा मूळचा विदर्भातील चंद्रपूर मधील रहिवासी असून तो गत २ वर्षांपासून सह्याद्री डोंगर रांगेची भटकंती करीत आहे.

बाल पणापासून इतिहास विषयाची आवड जपणारा आणि ट्रेकिंगचा छंद असल्याने साध्या सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास लोकांपर्यन्त youtube channel च्या माध्यमातून पोहचविण्याचे काम तो सातत्याने करीत आहे.

दोन वर्षात २०० हुन अधिक किल्ले सर करून sahyadri Rock adventure या team सोबत सह्यद्रीतील (वजीर सुळका वानरलिंगी सुळका अलंग मदन कुलंग यांसारखे अनेक कठीण समजल्या जाणाऱ्या ठिकाणी आरोहण करून लोकांमध्ये adventure बद्दल जनजागृती करण्याचे काम psycho prashil या youTube channel च्या माध्यमातून तो काम करीत आहे.

•जगातील सर्वात उंच शिखर म्हटलं तर आठवतो तो म्हणजे, माउंट एव्हरेस्ट. पण एव्हरेस्ट हा हिमालयाच्या पर्वत रांगेतील एक उंच शिखर आहे.

• जगातील सर्वात उंच शिखर (स्टॅंड अलोन माऊंटेन – stand alone mountain) म्हणून आहे तो दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो (Kilimanjaro) ज्याची उंची समुद्र सपाटी पासून ५८९५ मीटर इतकी आहे.

या शिखराला सर करून प्रशिल ने एक नवीन विक्रम नोंदला आहे. दरम्यान अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.