Home Breaking News Chandrapur city@ news • हजारों तरुण – तरुणींच्या घोषणाबाजीने चंद्रपूर दणाणले! ...

Chandrapur city@ news • हजारों तरुण – तरुणींच्या घोषणाबाजीने चंद्रपूर दणाणले! •उच्च शिक्षण घेणारे बेरोजगार उतरले रस्त्यावर!

70

Chandrapur city@ news
• हजारों तरुण – तरुणींच्या घोषणाबाजीने चंद्रपूर दणाणले!
•उच्च शिक्षण घेणारे बेरोजगार उतरले रस्त्यावर!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपुर: विदर्भातील वर्धा येथे सुशिक्षित बेरोजगारांचे एक आठवड्यापासून आंदोलन सुरू असतांनाच काल शुक्रवारला चंद्रपूर शहरातील हजारों उच्च शिक्षित युवक व युवती खासगीकरण व कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरल्याचे बघावयास मिळाले.

चंद्रपूर जिल्हा शिक्षण व नोकरी बचाव समितीच्या वतीने काल स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.या आंदोलनात शहरासह जिल्ह्यातील हजोरों सुशिक्षित बेरोजगार सहभागी झाले होते.शासनाने तातडीने कंत्राटी करणचा व खासगी करणाचा निर्णय तातडीने रद्द करावा ही प्रमुख मागणी निदर्शन करणा-यांची ह़ोती .

दरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी करणारेही विद्यार्थी व विद्यार्थिनीं काल झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने उतरली होती. बेरोजगारांच्या शासना विरोधी घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अक्षरशः दणाणून गेला होता.येत्या १५दिवसांत शासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही तर या पेक्षाही एक भव्य आक्रोश मोर्चा काढण्याची तयारी चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी ठेवली आहे. शहरातील अनेकजण शासनाच्या या निर्णयाविषयी काल संताप व्यक्त करताना दिसून आले. तर पालकवर्गांत शासनाविरोधात नाराजीचा सुर ऐकावयास मिळाला .