Home Breaking News राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने पोर्णिमा रणपिसे -सावंत सन्मानित !

राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने पोर्णिमा रणपिसे -सावंत सन्मानित !

56

राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने पोर्णिमा रणपिसे -सावंत सन्मानित !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपुर: राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ग्लोबल स्काॅलर फाउंडेशन संस्थेच्या वतीने दि.२ ऑक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने पुणे येथील ओर्चिड हॉटेल मध्ये राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान पुरस्कार (सन 2023 – 24 ) वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पद्मश्री डॉ. रविंद्र कुमार यांच्या हस्ते नाविन्यपूर्ण उपक्रमशील आदर्श शिक्षिका सन २०२३-२४ या पुरस्काराने पौर्णिमा रणपिसे-सावंत यांना या समारंभात गौरविण्यात आले.
विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन , विविध वर्तमानपत्रे तसेच मासिकांमध्ये शैक्षणिक, सामाजिक विषयांवरील लेखन, काव्यलेखन, चित्रपट समीक्षण, रेडीओ एफ एम वर स्वलिखित सुविचार, सुभाषित प्रसारण, विद्यार्थी प्रेरणादायी व्याख्याने लिहिणे तसेच प्रसारित करणे,महापुरुषांच्या जीवनावर व्याख्याने, शाळेत विविध विषयांवर उपक्रम सादरीकरण , कृतीयुक्त अध्यापन आयोजन, क्षेत्रभेट आयोजित करणे , किशोरवयीन मुलींना तसेच मातांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे तसेच अनाथाश्रम, वृध्दाश्रमास भेटी देऊन वृध्दांची विचारपूस करून जीवनावश्यक भेटवस्तू देणे अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे त्या आयोजन करीत असतात.पोर्णिमा रणपिसे -सावंत साहित्यातून सामाजिक व शैक्षणिक सलोखा जपण्याचे कार्य देखील उत्तम करीत असतात. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत आंतराष्ट्रीय संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. विविध स्तरांवरुन त्यांचे आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केल्या जात आहे.

सावंत यांना यापूर्वी देखील पुणे येथील चंद्रकांत दांगट पाटील शिक्षण व क्रीडा मंडळ यांचेतर्फे कार्यक्षम व कर्तव्यदक्ष विकासनाना दांगट पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार, या शिवाय महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमी यांचेकडून राज्यस्तरीय महात्मा फुले, सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार , तसेच निर्वाण फाउंडेशन नाशिक यांचेकडूनही राज्यस्तरीय सावित्रीज्योती सन्मान,व अटकेपार झेंडा फडकविणारे वीर सरदार मानाजी पायगुडे परिवार यांचेकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
“प्रेरणा ही पुरस्काराची एक दृश्य बाजू मानली तर जबाबदारी ही दुसरी अदृश्य बाजू असते” असे मत व्यक्त करत पोर्णिमा सावंत यांनी पुरस्काराच्या निमित्ताने भविष्यात विद्यार्थी व समाजहिताच्या दृष्टीने अधिक चांगले कार्य करण्याचे मत व्यक्त केले आहे.
जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे कार्य करता करता त्यांनी राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातल्याने शैक्षणिक, सामजिक, साहित्यिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे,मुख्य संयोजिका रंज्जू मोडक सहसंयोजिका वर्षा कोंगरे व सदस्यगणांनी पोर्णिमा सावंत यांचे अभिनंदन केले आहे.