Home Breaking News Bhadrawati taluka@news • शासकीय आश्रमशाळा चंदनखेडा येथे मुलांसाठी प्रेरणादायी व्याख्यान उपक्रम

Bhadrawati taluka@news • शासकीय आश्रमशाळा चंदनखेडा येथे मुलांसाठी प्रेरणादायी व्याख्यान उपक्रम

36

Bhadrawati taluka@news
• शासकीय आश्रमशाळा चंदनखेडा येथे मुलांसाठी प्रेरणादायी व्याख्यान उपक्रम

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : ता.प्र.भद्रावती

भद्रावती :- गुरुजी अजूनही आठवितो तुमच्या तो छडीचा मार, पण त्यातूनच उमगला मला जीवनाचा सार …जीवनात आई वडीलानंतर शिक्षकाचे मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आज स्वतःची एक ओळख निर्माण करता आली, त्यामुळे चुकीच्या कामाने गुरुजीनी दिलेली छडीही मोलाची ठरू शकते, असे प्रतिपादन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चंदनखेडा येथील प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सदानंद आगबतनवार यांनी अनुभव व्यक्त करतांना कथन केले, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथे दर शनिवार ला विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान उपक्रम राबविला जातो, त्यात समाजातील विविध क्षेत्रात ठसा उमटलेल्या व्यक्तीला आमंत्रित करून अनुभव कथन घेतल्या जाते, दि 7 ऑक्टोबर ला आयोजित या कार्यक्रमात पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सदानंद आगबतनवार यांना पाचारण करण्यात आले होते, याप्रसंगी अध्यक्षतेखाली असलेल्या मुख्याध्यापक गजेंद्र सोनुने सर यांनी शिक्षण म्हणजे नोकरी नव्हे तर एक चांगला माणूस निर्माण व्हावा ,याचसाठी अश्या अनुभव कथन उपक्रमाचे आयोजन सातत्याने केले जात असल्याचे कथन केले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत ज्ञानेश्वर सोनूले, भोयर सर,उराडे सर,ढेंगळे सर,मसराम सर,सहारे म्याडम,गजभिये म्याडम हे होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षिका भारती ताई उरकांडे यांनी केले