Home Breaking News जन्मु द्या त्या चिमुकलीला !◼️ ♦️लक्ष्मी येता घरा…!🟨 🌺♦️कु.मनिषा...

जन्मु द्या त्या चिमुकलीला !◼️ ♦️लक्ष्मी येता घरा…!🟨 🌺♦️कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे ◻️पाचोरा◼️जळगांव

67

जन्मु द्या त्या चिमुकलीला !◼️
♦️लक्ष्मी येता घरा…!🟨

🌺♦️कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे ◻️पाचोरा◼️जळगांव

🔸आनंदाचा क्षण|लक्ष्मी येता घरा
गोड धोड करा|स्वागतास||1||

लेक बाई साधी|पिढी जन्मा घाले
पाळणा तो हाले|घरोघरी||2||

🔸तिला का मारता?|नकोशी ती वाटे
प्रेम पार दाटे|उरी तिच्या
||3||

🔸घर ती सांभाळे|मायेची सावली
लेक ती मावली|जिव्हाळ्याची
||4||

🔸करुणा हृदयी|प्रिय आई बाप
नाही मनी पाप|लेकीच्या या
||5||

🔸श्वास नका कोंडू|पाहील ती जग
हर्ष,मोद मग|जीवनात||6||

पुण्याई तुमची|लेक जन्मा यावी
सुखे तिला द्यावी|अतोनात
||7||