Home Breaking News Gadchiroli dist@ news • होवु द्या चर्चा कार्यक्रमाद्वारे घटनाबाह्य व बंडलबाज सरकार...

Gadchiroli dist@ news • होवु द्या चर्चा कार्यक्रमाद्वारे घटनाबाह्य व बंडलबाज सरकार चा भंडाफोड. •महाराष्ट्रातील आडमार्गाने सत्तेत आलेली घटनाबाह्य सरकार व केद्रांतील बंडलबाज सरकार ला येत्या निवडनुकीत जमीनीत गाडा: शिवाजीराव झोरे

123

Gadchiroli dist@ news
• होवु द्या चर्चा कार्यक्रमाद्वारे घटनाबाह्य व बंडलबाज सरकार चा भंडाफोड.

•महाराष्ट्रातील आडमार्गाने सत्तेत आलेली घटनाबाह्य सरकार व केद्रांतील बंडलबाज सरकार ला येत्या निवडनुकीत जमीनीत गाडा: शिवाजीराव झोरे

✍️रोशनी बैस
सुवर्ण भारत:उपसंपादक

गडचिरोली:महाराष्ट्रात १ वर्षापुर्वी आडमार्गाने व घटनाबाह्य रित्या सत्तेत आलेल्या मिंदे सरकारला व केंद्रातील देशातील जनतेचे वाटोळा करनार्या सरकारला येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवुन द्या असे आक्रोशाचे मत शिवाजीराव झोरे संपर्कप्रमुख गडचिरोली विधानसभा यांनी व्यक्त गेले.ते दिंनाक ०८/१०/२०२३ रोजी वाघोली तालुका चामोर्शि जिल्हा गडचिरोली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे वतीने आयोजीत होवु द्या चर्चा या कार्यक्रमात जनतेशी चर्चा करतांना बोलत होते.

यावेळेस शिवाजी झोरे यांनी २०१९ मध्ये मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे नेतृत्वात महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर राज्यात राबविन्यात आलेल्या शिव भोजन,शेतकर्यांची २ लाखापर्यंतचीकर्ज माफी,औरंगाबाद चे नाव संभाजीनगर व उस्मानाबाद चे नाव धाराशीव करणे,नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव मदत इत्यांदी योजनांची माहीती दिली तसेच राज्य व केंद्र सरकारच्या फसव्या योजनांच‍ा भंडाफोळ केला.
नरेद्रं मोदी नी केलेल्या अनेक फसव्या योजना जसे प्रत्येकाचे खात्यात १५ लाख रुपये टाकने,सुशिक्षित मुलांना नोकर्या देने वै.चां भंडाफोळ माजी आमदार रामकृष्ण मडावी आरमोरी यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधनु केला.
नरेद्र मोदीची उज्वला गँस योजना, त्यावरील न मिळनारी सबसीडी,पेट्रोल – डिझेल चे आकाशाला भिडलेली महागाई,भेडांळा सर्कल मध्ये होत असलेली विजेची लोडशेडिंग या विषयावर विलास कोडापे जिल्हा सह संपर्कप्रमुख यांनी उपस्थितासोबत चर्चा केली.

शिवसेनेच्या भरोशावर मोठा झालेला पक्ष भाजपा चे लोक कसे गद्यारी करुन आड मार्गाने सत्तेत बसले व आज लोकांचे काय हालअपेष्टा राज्याती जनतेचे होत आहेत यावर वासुदेव शेडमाके जिल्हाप्रमुख यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला.

यावेळेस सुनिल पोरड्डीवार उप जिल्हाप्रमुख गडचिरोली विधानसभा ,राजेंद्र लाजेकर विधानसभा समन्वयक,श्रीमती कल्पनाताई तिजारे माजी डिपीडिसी सदस्य इत्यादिंनी यावेळेस आपले विचार व्यक्त केलेत.
कार्यक्रमाला विलास ठोंबरे,बंडु नैताम,अंकीत सब्बनवार उप जिल्हाप्रमुख,प्रदिप सातपुते तालुका प्रमुख चामोर्शि शहर,मनोज पोरटे चामोर्शि (ग्रामिण) तालुका प्रमुख,बंडु नैताम शहर प्रमुख इत्यादी प्रमुख इत्यादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात गावकुसा पासुण पाहुने मंडळीनां फटाके फोडुन वाजत गाजत गावात मिरवणुकी चे द्वारे नेण्यात आले.

कार्यक्रमास गावातील महिला,पुरुष व मले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.(डब्यात) वाघोली गावात पोहचन्यासाठी भेंडाळा ते वाघोली हे कि.मी.चे अतंर पार करण्यास १ तासाचा वेळ लागतो व रस्ते अत्यंत खड्डे मय असल्याकारणाने वाघोली फाटा ते वाघोली येन्यास हा २-३ कि.मि.चा प्रवास पुर्ण करन्यास ०-५ ते १ तास लागतो व याभागातील विजेची लोडशेडिंग बंद करण्यासाठी शिवसेनेचे वतीने आंदोलन करण्यात येईल व वेळ प्रसंगी केसेस लागल्यातरी आम्ही मागे हटनार नाही अशी ग्वाही शिवाजीराव झोरे,रामकृष्ण मडावी,विलास कोडापे,वासुदेव सेडमाके व इतर शिवसेना पदाधिकारी यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन कीरण सेडमाके तालुका प्रमुख धानोरा यांनी केले.

.