Home Breaking News Chandrapur dist@ news • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे टिझर लाँच

Chandrapur dist@ news • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे टिझर लाँच

39

Chandrapur dist@ news
• मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे टिझर लाँच

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:राज्याचे मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपूरात आयोजित श्री माता महकाली महोत्सवाच्या पहिल्या टिझरची लाँचींग करण्यात आली आहे. काल मुबंई येथे मुख्यमंत्री यांनी सदरहु डिझरची लाँचींग केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती.
माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी चंद्रपूरात सुरु आहे. दि.19 ऑक्टोंबर पासून महोत्सवाला सुरुवात होणार आहे. यासाठी विविध नामवंत कलावंत चंद्रपूरात येणार असून या दरम्यान सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कायक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी पार पडलेल्या श्री महाकाली महोत्सवाला नागरिकांचा मिळालेला सहभाग लक्षात घेता यंदाही महोत्सव भव्य होणार असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.
आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री माता महाकाली महोत्सवच्या पहिल्या टिझरची लाँचिंग करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महोत्सवाबाबत आमदार जोरगेवार यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे. सदरहु टिझरमध्ये यंदाच्या महाकाली महोत्सवातील आकर्षण दर्शविण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापुर्वी आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांना श्री माता महाकाली महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली आहे. त्यांनी माता महाकालीच्या दर्शनासाठी महोत्सवा दरम्यान चंद्रपूरात येणार असल्याचे म्हटले आहे.