Home Breaking News ◾◻️‌मंगळागौर आणि आम्ही…..!◻️◼️ 🏵️सौ.दिपाली जाधवसहज सुचलं रांगोळी कला ग्रुप नवी मुंबई

◾◻️‌मंगळागौर आणि आम्ही…..!◻️◼️ 🏵️सौ.दिपाली जाधवसहज सुचलं रांगोळी कला ग्रुप नवी मुंबई

48

◾◻️‌मंगळागौर आणि आम्ही…..!◻️◼️

🏵️सौ.दिपाली जाधवसहज सुचलं रांगोळी कला ग्रुप नवी मुंबई

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

तसं आमचा मंगळागौरीचा ग्रुप खूपच “हौशी” आम्ही अगोदरच्या सहा ते सात जणी आणि नवीन आता आलेल्या सहा सदस्यांनी हा ग्रुप आम्ही मंगळागौरचा तयार केला “कवी कुसुमाग्रज” वाचनालय मंगळागौर संघ, सीवूड, नवी मुंबई, तसा आमचा हा ग्रुप दहा ते चौदा जणींचा. सीवूड स्मॉल मध्ये झालेल्या नॅशनल स्पर्धेनंतर ज्या मैत्रिणींना जमेल तसे त्यांनी मंगळागौर मध्ये भाग घेतला आम्ही जाट समाजाची अश्विनीताई घंगाळे यांनी घेतलेली मंगळागौर “लोकमत सखी” मंच पनवेल जी आणि आत्ता झालेली “मनसेची” अशा तीन मंगळागौर केल्या. खूप अडथळे पार केल्यानंतर अडथळे म्हणजे कसे की कुणाच्या मुलाच्या एक्झाम सुरू आहे कुणी आजारी आहे .अशा गोष्टी की ज्यामध्ये आम्ही ॲडजस्टमेंट करू शकत नव्हतो ,पण असे करता करता आम्ही तीन दिवसांमध्ये आत्ता मनसे ची मंगळागौर सादर केली त्यात आम्ही फक्त सहा जणी . जो सादरीकरण केलं त्याचा जर व्हिडिओ बघितला तर तो अतिशय सुंदर आहे फक्त त्यामध्ये आम्हाला आता कळले की आम्हाला काय अधिक करायला हवे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना तसेच काही.. आम्ही प्रत्येक वेळेस स्पर्धेसाठी जातो याचा अर्थ आम्हाला कोणतेही प्रकारचे कामे नसतात असे काही नाही” हौशीला मोल” नसते हीच ती गोष्ट आम्ही आपल्या वाचनालयाचे प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे आणि त्यात आपल्या सर्वांचा आम्हाला जो पाठिंबा असतो.त्यामुळे आम्हाला उभारी येते प्रत्येक वेळेस आम्ही नवीन काहीतरी त्यामधून शिकतो आणि बरं का आम्ही जातो तिथे तर सर्व काही विसरून मनोरंजन आणि आनंदाने सादरीकरण करतो नंबर आला नाही म्हणून काय झालं ?आम्ही सर्व गोष्टी सांभाळून घर नोकरी मुलं बिजनेस हे सर्व बघून तारेवरची कसरत करून हे सर्व करतो तुमचे “आशीर्वादाने” शुभेच्छा आमच्या सोबत असतातच त्यामुळेच आम्ही सर्व करू शकतो. यावेळी आम्ही भाग घेतलेल्या फक्त सहा जणी होतो . तीन दिवसांच्या बदलांमध्ये सादरीकरण बऱ्यापैकी सुंदर झालं. बरच काही शिकलो चाळीस ग्रुप आले होते मंगळागौरचे अतिशय विविधतेने त्यांनी सादरीकरण केलं पारंपारिकता आणि आधुनिकता याची सांगड घालत मंगळागौर संपन्न झाले.