Home Breaking News लेख लेखन मानसिक छळ 🔸🌺सौ. शैला चंद्रकांत चिमडयालवार सहज सुचलं...

लेख लेखन मानसिक छळ 🔸🌺सौ. शैला चंद्रकांत चिमडयालवार सहज सुचलं सदस्य सावली जि. चंद्रपूर

87

लेख लेखन

मानसिक छळ

🔸🌺सौ. शैला चंद्रकांत चिमडयालवार सहज सुचलं सदस्य सावली जि. चंद्रपूर

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मानसिक छळ सतत कुठेही कुणावरही होत असते कुटुंबात सासू सुनेला रोज मानसिक छळ करीत असते. कितीही चांगली वागली तरी कुटुंबातील सर्वांना मोहपाशात घेऊन ती सुनेला पैशासाठी किंवा क्षुल्लक कारणा साठी त्रास देत असते.कारण ती त्यांची विकृती असते.
आफीस मधे मुख्य अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करतात. दबावाखाली असतात कित्येक महिला कुटुंबाचा आधार असतात. नोकरीसाठी निमूटपणे सहन करतात आणि म्हणूनच हा प्रकार वाढतो आहे.
सावत्र मुलीवर सावत्र आई सुद्धा वयाचा विचार न करता मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत असते. इतकेच नाहीतर मोठया शहरात मुलींचा सौदा करायला दलाल असतात.
रस्त्यावरचे रोमिओ एखाद्या विद्यार्थीनीचा.. रोज मानसिक छळ करतात कुठे बोभाटा केला तर जीवे मारण्याची धमकी देतात.
एखादी स्त्री साधी भोळी असली की नवरा कारण नसतांनाही छळ करतो कारण त्या व्यक्तीचा स्वभाव बनलेला असतो किंवा तो व्यभिचारी असतो.
अश्या काही घटना असतात की स्त्री पण पुरुषांचा मानसिक छळ करते. बदनामीच्या धाकाखाली पुरुष मुलांना सांभाळून घर सांभाळते. असे कित्येक उदाहरण आहे स्त्री व्यभिचाराने पळून जाते.
सारासार विचार करता कुणीही सहन न करता खंबीरपणे सामोरे जावून परिस्थितीचा आढावा घेऊन आपली समस्या हाताळावी हेच योग्य व सत्य आहे.