Home Breaking News Mul taluka @news • मूल नगरीत घडला धक्कादायक प्रकार ;गर्भवती महिलेला ...

Mul taluka @news • मूल नगरीत घडला धक्कादायक प्रकार ;गर्भवती महिलेला युवकांनी केली मारहाण ! •दारुच्या नशेत होतेय”ते”युवक ? •आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा राजू झोडेंची मागणी

85

Mul taluka @news
• मूल नगरीत घडला धक्कादायक प्रकार ;गर्भवती महिलेला युवकांनी केली मारहाण !
•दारुच्या नशेत होतेय”ते”युवक ?
•आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा राजू झोडेंची मागणी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मूल:दारूच्या नशेत असलेल्या युवकांच्या टोळीने एका गर्भवती महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मूल नगरीत शनिवारी रात्री घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.घटनेची माहिती उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन सहानुभूतीने सदरहु महिलेची विचारपूस केली तसेच मूल पोलिसांनी आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
शनिवारला रात्री या शहरात गणेश विसर्जन होते.

त्याच परिसरात वास्तव्य करणारे बोर्डावार यांनी पत्नी गर्भवती आहे .जोरात आवाज करू नका अशी विनंती त्यांना केली मात्र ते युवक दारूच्या नशेत असल्याने त्यांनी बोर्डावार यांना मारहाण केली.नंतर पतीचा बचाव करण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेला सुद्धा युवकांच्या टोळीने मारहाण केली.या संदर्भात मूल पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या बोर्डावार यांना आधी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले
उपरोक्त घटना अत्यंत घृणास्पद व दुर्दैवी असून दारूच्या नशेत गर्भवती महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपी युवकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राजू झोडे, आकाश बोर्डावार, विवेक मुत्यलवार,सचिन बोर्डावार, सुरेश फुलझले,गौरव पिलरवार, वैभव कोमलवार, आकाश कावळे, राकेश गुरनुले, विकास बोर्डावार, चिकू निकोडे, मंगेश नेताम उज्वल निकुरे यांनी केली आहे.