Home Breaking News Gadchiroli dist@ news • जाती- जाती,धर्मा-धर्मा मध्ये भांडण व खुर्ची साठी जनतेचा...

Gadchiroli dist@ news • जाती- जाती,धर्मा-धर्मा मध्ये भांडण व खुर्ची साठी जनतेचा वाटोळा करनार्या बेईमान सरकारला येत्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवुन द्या :विलास कोडापे

41

Gadchiroli dist@ news
• जाती- जाती,धर्मा-धर्मा मध्ये भांडण व खुर्ची साठी जनतेचा वाटोळा करनार्या बेईमान सरकारला येत्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवुन द्या :विलास कोडापे

✍️रोशनी बैस
सुवर्ण भारत:उपसंपादक

गडचिरोली:सध्याची राज्यातील सरकार ओबिसी विरुद्ध मराठा तसेच आदिवासी विरुद्ध धनगर यांचे मध्ये भांडण लावलेली असुन इंग्रजांची तोडा-फोडा व राज्य करा या निती नुसार राज्य करीत आहे.

राज्यातील मिंदे सरकार ही शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडुन एक एक आमदारास ५०-५० खोके देवुन सत्ता बळकावलेली आहे.व आता ह्या पैशाची वसुली साठी राज्यातील जनतेच्या मुलभुत सोई सुद्धा देत नाही.जनतेला पिण्याचे पाणि मिळत नाही,राहायला घरे नाहीत घरकुल योजनेमध्ये पैसा दिल्या जात नाही,तरुणाच्यां हाताला रोजगार नाही,जिल्ह्यातील एकमेव रोजगारी चा स्तोत्र असलेल्या सुरजागड लोह प्रकल्पामध्येही दुसर्या राज्यातील लोक आणुन कामावर घेतले आहेत व जिल्ह्यातील तरुण बेरोजगार रोजगारीचे शोधात भटकत आहेत.
मात्र उप मुख्यमंत्री केवळ सुरजागड प्रकल्पातुन गडगंज पैसा कमविन्यासाठी जिल्हाचे पालकमंत्री पद स्वत:कडे ठेवुन घेतलेले आहे.शाळाचे खाजगीकरण ,शासकीय कार्यालयाती नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करने असे अनेक फसव्या योजना मुळे राज्यातील जनतेचे वाटोळा हे सरकार करीत आहे.

याउलट सुरवातीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रि असतांना शिव भोजन,कास्तकाराची कर्ज माफी,बेघरवासियांना घरकुल,गडचिरोली जिल्ह्याचे विकासासाठी विशेष निधी,औरगांबाद शहराचे नाव बदलवुन संभाजी नगर करणे या सारख्या अनेक लोकाभिमुख व राज्यातील जनतेच्या हितांचे योजना राबविल्या. कोरोणा काळामध्ये वाखाणण्याजोगं कार्य केले ज्याची जगात प्रशंसा झाली व खुद नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांनी देशाचे इतर राज्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्रि हे कोराणावर नियत्रंण मिळवुन राज्यातील जनतेला ह्या संकटातुन बाहेर काढण्यासाठी ज्या योजना राबवित आहेत त्या योजना राबविन्यास इतर राज्यानां सुचविले होत.

मात्र कोराणावर पुर्ण मात केल्यानंतर याची क्रेडीट उद्धव ठाकरे साहेबांना मिळु नये म्हनुन खोटे आरोप लावुन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.
राज्यातील बेईमानीने सत्तेत आलेली मिंदे सरकार व केद्रांतील मोदी सरकार ही आदिवासी,दलित व इतर मागासवर्गीयांचे विरोध करनारी आहे.म्हणुनच अशा बेईमान सरकारला येत्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवुन द्या असे आवाहन विलास कोडापे शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख यांनी केले.

■पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे आदेशान्वये विनायक राऊत सचिव,प्रकाश वाघ पुर्व विदर्भ समन्वयक,महेश केदारी जिल्हा संपर्कप्रमुख ,शिवाजीराव खोडदे पाटील यांचे मार्गदर्शनात अहेरी नगर पंचायत चे गडअहेरी■

या आदिवासी बहुल वार्डात ◆होऊ द्या चर्चा◆ कार्यक्रमात चर्चेचे वेळेस ते बोलत होते. यावेळेस केंद्र सरकारच्या उज्वला गँस योजना, विमानतळ,एलआयसी,विद्युत मंडळ यासारखे संस्थाचे खाजकीकरणाचा भंडाफोड अरुण धुर्वे उप जिल्हाप्रमुख व दिलीप सुरपाम युवासेना अधिकारी यांनी केला.

कार्यक्रमास विलास कोडापे सह संपर्कप्रमुख,अरुण धुर्वे उप जिल्हाप्रमुख,बिरजु गेडाम विधानसभा संघटक,दिलीप सुरपाम युवा सेना अधिकारी,राकेश मुन्नरवार उप जिल्हाधिकारी युवासेना,अक्षय गहेरवार युवासेना,राजु मामिडवार उप तालुका प्रमुख ,अनिल सराफवार जेष्ट शिवसैनिक इत्यादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळेस गडअहेरी वार्डातील आदिवासी लोकांनी मागील एक वर्षापासुन पिण्याचे पाणि मिळत नाही पण पाणि पट्टी कर प्रत्येकी १२oo रुपये आलेला आहे,पाणि टँकर ने देत होते पण मागिल काही महिन्यापासुन तेसुद्धा बंद केले आहेत,वार्डात नाल्या व रोड नाहीत,घरकुल मिळालेले नाहीत इत्यादी समस्या मांडल्या व त्या पाठपुरावा करुन सोडविण्यास मदत करण्याची ग्वाही शिवसेना पदाधिकारीनीं दीली.