Home Breaking News Chandrapur dist @news • भाऊंच्या” दांडिया”चे थाटात उद्घाटन ! •माजी खा.नरेशबाबू पुगलिया...

Chandrapur dist @news • भाऊंच्या” दांडिया”चे थाटात उद्घाटन ! •माजी खा.नरेशबाबू पुगलिया यांची उपस्थिती

293

Chandrapur dist @news
• भाऊंच्या” दांडिया”चे थाटात उद्घाटन !
•माजी खा.नरेशबाबू पुगलिया यांची उपस्थिती

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपूर : वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राच्या आमदार तथा “भाऊचा दांडिया”च्या संयोजिका आ.प्रतिभा धानोरकर यांनी आयोजित केलेल्या “भाऊचा दांडिया” चे उद्घाटन दि. १७ ऑक्टोंबर २०२३ ला रात्री ८.०० वाजता चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या शुभहस्ते पार पडले.
याप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले कि दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्यांची क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, कृषी व इतर क्षेत्रात आवड होती. तो वसा पुढे नेण्याकरिता मी सदैव कटिबद्ध आहे.
या वेळी चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले .ते म्हणाले की चंद्रपूर-वणी आणि आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांनी चंद्रपूर येथे नवरात्रीच्या मंगल पर्वात “भाऊचा दांडिया” ची सुरुवात केली व नवरात्रीच्या पर्वात जनतेच्या आंनदाच्या उपक्रमात त्यांनी विशेष भर घातली.
आज बाळूभाऊ धानोरकर आपल्यात नाही पण ते स्मृतीशेष स्वरूपात आपल्यात आहेत त्यांची स्मृती म्हणून सुरू केलेल्या “भाऊचा दांडिया” या उपक्रमाला अव्याहत सुरू ठेवण्याचा संकल्प करून प्रतिभा धानोरकर यांनी यावर्षी सुध्दा “भाऊचा दांडिया” आयोजित केला आहे.
आयोजित केलेल्या “भाऊचा दांडिया” मध्ये शेवटच्या दिवशी ग्रुप दांडिया मध्ये ज्या ग्रुपचा प्रथम क्रमांक येईल त्या ग्रुपला स्व. राजमल पुगलिया ( निर्वाचित प्रथम अध्यक्ष, नगरपालिका चंद्रपूर १९४१-१९४७ ) यांचे स्मृतीप्रित्यर्थ राजमल पुगलिया फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे रु. १,००,०००/- (रुपये एक लाख ) चे प्रथम पुरस्कार देण्यात येईल.
तर”भाऊचा दांडिया” कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी कपल डॉन्स मध्ये ज्या गृपचा प्रथम क्रमांक येईल त्या कपल-गृपला स्वातंत्र्य सेनानी स्व.उत्तमचंद राजमल पुगलिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुगलिया परिवारा तर्फे रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार ) चे बक्षीस देण्यात येईल. अशी घोषणा या वेळी करण्यात आली
याप्रसंगी विदर्भ किसान मजदुर काँग्रेस चे ग्रामीण अध्यक्ष गजानन गावंडे, शहर अध्यक्ष तथा मनपा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, माजी नगरसेवक अशोक नागपुरे, व अन्य मान्यवर तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.