Home Breaking News Bramhpuri taluka@ news • हायवाट्रकने धडक दिल्याने रेल्वे फाटक तुटली

Bramhpuri taluka@ news • हायवाट्रकने धडक दिल्याने रेल्वे फाटक तुटली

132

Bramhpuri taluka@ news
• हायवाट्रकने धडक दिल्याने रेल्वे फाटक तुटली

✍️रवि चामलवार
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,ब्रह्मपुरी

ब्रह्मपुरी:आरमोरी राष्ट्रीय महामार्ग पेटवार्ड जवळील रेल्वे गेटला हायवा ट्रकने धडक दिल्याने रेल्वे गेट तुटून पडली.
ही घटना दी.२८ ऑक्टोंबरला ४:२५ वाजताच्या दरम्यान घडली त्यामुळे काही वेळासाठी वाहतूक खोळंबली होती. मात्र
वेळीच वाहतूक पोलिस राहुल लाखे, व कोंडापे यांनी सदर ठिकाणी येऊन वाहतूक सुरळीत केली.

मिळालेल्या माहितीनुसार ४:२५ दरम्यान गोंदिया वरून ब्रह्मपुरी मार्गे बल्लारशाकडे जाणारी मालवाहक ट्रेन या रूट वरून जात होती. ट्रेन वेळेत येत असल्यामुळे रेल्वे गेट किपर आनंदराव मेश्राम यांनी वेळेच्या पाच सात मिनिट अगोदर सायरन वाजवीत गेट बंद करण्याचा इशारा दिला. मात्र भरधाव वेगात हायवा ट्रक क्रमांक एम, एच१६सि,ए,०१६९ ब्रह्मपुरी वरून आरमोरी कडे जात असतांना सदर चालकास ट्रक अनियंत्रित झाल्यामुळे आडव्या गेटला धडक दिल्यामुळे पूर्णता रेल्वे गेट तुटून पडले.

त्यामुळे काही वेळासाठी वाहतूक खोळंबली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी वेळीच घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. पुढील कारवाई रेल्वे विभाग करीत आहे.