Home Breaking News Chandrapur city@ news • स्व. इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी कॉग्रेसचे नेते माजी...

Chandrapur city@ news • स्व. इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी कॉग्रेसचे नेते माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात आदरांजली कार्यक्रम संपन्न.

529

Chandrapur city@ news
• स्व. इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी कॉग्रेसचे नेते माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात आदरांजली कार्यक्रम संपन्न.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

चंद्रपूर : राष्ट्रमाता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांनी देशाच्या अखंडतेसाठी प्राणार्पण केले. त्या आपल्या प्रेरणास्त्रोत असून आदर्श आहे. त्याच्या आदर्शानुसार आपण कार्य केले पाहिजे. असे आवाहन माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी केले.
विदर्भ किसान मजदूर कॉग्रेस जि. चंद्रपूरच्या वतीने देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आर्यन लेडी राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्य स्थानिक प्रियदर्शिनी चौकातील राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळाला माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली.
माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मौन श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली व इंदिरा अमर रहे… जब तक सुरज चांद रहेगा .. इंदिराजी तेरा नाम रहेगा.. असे घोषणा देण्यात आले.
याप्रसंगी विदर्भ किसान मजदूर कॉग्रेसचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष गजाननराव गांवडे, युवक कॉंग्रेसचे करण पुगलिया, जिल्हा महासचिव अँड. अविनाश ठावरी, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक अशोक नागापुरे, इंटकचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, कामगार युनियनचे वसंत मांढरे, तारासिंग कल्सी, क्रिष्णन नायर, वी. के मुन, नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष अँड. विजय मोगरे, चेतन गेडाम, विरेंद्र आर्य, गजानन दिवसे, अनिल तुगीडवार, दुर्गेश चौबे, विश्वास जोगी, सुधाकरसिंग गौर, रतन शिलावार, अजय महाडोळे, अनंता हुड, सायरा बानो, क्रिष्णा यादव, श्रीनिवास पारनंदी, पृथ्वी जंगम, महेश वाटेकर, हेमंत आक्केवार, सुदर्शन पुली, विनोद महंतो, सुरेश बोडणे, राजेंद्र शुक्ला, शंकर महाकाली, रमेश यलपूला, लालसिंग, भारत जंगम व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.