Home Breaking News Chandrapur dist@ news •चंद्रपूर जिल्ह्यातील खेंळाडू महाराष्ट्र कराटे लीग मध्ये चमकले

Chandrapur dist@ news •चंद्रपूर जिल्ह्यातील खेंळाडू महाराष्ट्र कराटे लीग मध्ये चमकले

538

Chandrapur dist@ news
•चंद्रपूर जिल्ह्यातील खेंळाडू महाराष्ट्र कराटे लीग मध्ये चमकले

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मानली जाणारी कराटे प्रीमियर लीग शरयू चषक २०२३ दि. २१ व २२ ऑक्टोबर २०२३ ला बारामती पुणे येथे आयोजित केली होती. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून १२०० विध्यार्थ्यांनी व ३०० पंचांनी सहभाग नोंदवीला.
यात चंद्रपूर जिल्ह्यातील १६ विध्यार्थ्यांनी २६ पदकांची लूट केली. शिहान रवींद्र कराळे सरांनी सदर स्पर्धा उत्तम रित्या आयोजित केली होती. शरयू फाउंडेशन ही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर वेगवेगळ्या कार्यक्रमातून समाजसेवा करीत असते अश्या या शरयू फाउंडेशन च्या अध्यक्षा मा. शर्मिलाताई पवार स्पर्धेच्या उदघाटन समारंभत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
स्पर्धेतील प्रमुख आकर्षण चॅम्पियन ऑफ चॅम्पियन च्या फायनल मध्ये चंद्रपूरच्या नरेश दाणे थटाल विरुद्ध रांजणगाव पुणे च्या गणपत सोनटक्के मध्ये चूरशीच्या लढाईत नरेश ला १७००० रु च्या रोख बक्षीसासह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिला गटात कु. आर्थिका संजय उपाध्ये नी कात्याचे नेत्रदिपक प्रदर्शन करीत गोल्ड मेडल पटकाविले. लाईट वेट कॅटेगरी मध्ये रिशिक अमोल गिरडकर २ स्वर्ण पदक, मारिया हाकिम हुसैन१ स्वर्ण१ रजत पदक, हार्दिक राजेश सिंग१ स्वर्ण १ रजत पदक, आर्येश संजय उपाध्ये १ स्वर्ण १ रजत पदक, इमानुएल डॉनियल परेरा १ स्वर्ण १ रजत पदक, भार्गव विजय मेहता 1 स्वर्ण १ रजत पदक, शिवम सिंगरवेलन १ स्वर्ण पदक, माहिन सिकंदर खान १ रजत १ कांस्य पदक, शौर्य विवेक बोढे २ रजत पदक, श्लोक मंगेश नागपुरे २ रजत पदक, शौर्या अमोल गिरडकर १ रजत पदक, सानिया प्रवीण साकरकर १ रजत पदक, नाविन्य अतुल यूवनाते २ कांस्य पदक, जानवी सचिन मांगुळकर १ कांस्य पदक असे एकूण २६ मेडल जिंकत चंद्रपूर जिल्ह्याचे नाव बारामतीत गाजविले. बक्षीस वितरण सोहळायचे प्रमुख पाहुणे माननीय श्री. युगेंद्रदादा पवार यांच्या शुभ हस्ते विजयी खेळाडूंना बक्षिसे देण्यात आली.
सर्व स्पर्धक फिटटूफाईट्स मार्शल आर्टस् अँड फिटनेस सेन्टर मध्ये सराव करीत असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यशस्वी टीम कोच म्हणून मंजित अजित मंडल सर व वृषभ सावसाकडे सर यांनी काम पहिले. विध्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील तथा फिटटूफाईट्सचे प्रमुख शिहान विनय बोढे, प्रमुख प्रशिक्षक सेन्सेई मुहाफिज सिद्दीकी,अंकुश राजकुमार मुळेवार यांना दिले.