Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर शहरात व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या

Ballarpur city@ news • बल्लारपुर शहरात व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या

400

Ballarpur city@ news
• बल्लारपुर शहरात व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या

सुवर्ण भारत:शंकर महाकाली

बल्लारपूर :- शहरातील बुद्ध नगर वार्ड, अशोक सम्राट चौक कारवा रोड येथील एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सुरेश उर्फ कालु तुळशीराम वाघमारे वय ४८ वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. काल रात्री अशोक सम्राट चौक येथे वर्षवास समाप्ती निमित्त भोजनदान चे कार्यक्रम होते. तिथे ते रात्री १२ – १२.३० वाजता पर्यंत जेवण वाढले होते. त्यानंतर ते घरी येऊन झोपले. सकाळी पाच वाजता ते फिरायला सुध्दा गेले होते. त्यानंतर त्यांनी घरी येऊन गळफास लावले असे माहिती मिळाली.
पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्राची राजूरकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक उपपोलीस निरीक्षक सुनील कांबळे करीत आहे.
मृतक सुरेश वाघमारे यांना पत्नी सह दोन मुली आहेत.