Home Breaking News Chandrapur dist@ news • गट प्रवर्तक व आशा संपा बाबत आरोग्य...

Chandrapur dist@ news • गट प्रवर्तक व आशा संपा बाबत आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा! •आशांना मिळणार आता ७ हजार रुपये तर गट प्रवर्तंकांना मानधन वाढ देण्याचा निर्णय ! •गट प्रवर्तकांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे अजूनही संप सुरुच!

1707

Chandrapur dist@ news
• गट प्रवर्तक व आशा संपा बाबत आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा!
•आशांना मिळणार आता ७ हजार रुपये तर गट प्रवर्तंकांना मानधन वाढ देण्याचा निर्णय !
•गट प्रवर्तकांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे अजूनही संप सुरुच!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तक यांच्या रास्त मागण्यांची दखल न घेतल्याने संयुक्त कृती समितीच्या वतीने आशा व गट प्रवर्तकांनी गेल्या १८ऑक्टोबर पासुन राज्यव्यापी संप सुरु केला होता. त्या अनुषंगाने मुंबई येथे दि.1 नोव्हेंबरला राज्याचे आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत, आयुक्त धीरजकुमार आरोग्य अभियान, आरोग्य प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर , आरोग्य अतांत्रिक संचालक सुभाष बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आशा गट प्रवर्तकांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली .या वेळी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.🔳◽बैठकीत आरोग्य मंत्री यांनी आशांना दरमहा ७हजार रूपये मानधन वाढ करण्यात येईल. तसेच गट प्रवर्तक यांना ६२००रू. वाढ देण्यात येईल. या शिवाय दिपावली भाऊबीज भेट २ हजार रुपये देण्यात येणार. तसेच आशांना मोबाईल रिचार्ज भत्ता १००रू. वरून ३००रु. जननी सुरक्षा योजना मध्ये सरसकट लाभ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. २०१८पासून केंद्र सरकारने आशा गट प्रवर्तक ना मोबदला वाढ दिली नाही. त्या बाबत राज्यसरकार केन्द्र सरकारला केंद्राने मोबदला वाढ द्यावी. अशी शिफारस करेल. आरोग्य वर्धिनीचा लाभ गट प्रवर्तक सुद्धा मिळेल ,या निर्णयाचे कृती समितीने स्वागत केले आहे.
🔳⬜ मात्र गट प्रवर्तक गेलीं १८वर्ष फक्त प्रवास भत्तावर काम करत आहे. कंत्राटी ऑर्डर असून सुद्धा सामाजिक सुरक्षा लागू नाही. त्यांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या व त्या प्रमाणे वेतन लागू करा , उच्च शिक्षित गट प्रवर्तकांना किमान वेतन द्या, यासाठी कृती समिती आग्रही आहे. शासनाने गट प्रवर्तकना न्याय द्यावा अशी विनंती शासनास करित आहेत. गट प्रवर्तक यांची मागणी पूर्ण होई पर्यंत हा संप सूरू राहील असा निर्णय घेण्यात आला. बैठकीस कृती समितीचे राजू देसले, विनोद झोडगे,एम. ए .पाटील, शंकर पुजारी, आनंदी अवघडे, भगवान देशमुख, सुवर्णा मेतकर, प्रतिभा कर्डक, अर्चना गडाख, सुवर्णा गांगुर्डे,माया घोलप, सुवर्णा लोहकरे, सुरेखा खैरनार, सविता हगवणे, पाटील आदिं उपस्थित होते.
परंतु योग्य तोडगा न निघाल्याने आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आयटकच्या नेतृत्वात 16 व्या दिवशीही विशाल जिल्हाव्यापी धरणे आंदोलन करीत संप सुरू ठेवण्याचा निर्धार राज्य सचिव विनोद झोडगे यांनी घेतला आहे.यावेळी आंदोलनात रवींद्र उमाटे ,प्रदीप चिताडे,राजू गैंनवार,निकीता नीर, फर्जना शेख, सुहासनी वाकडे,मीना चौधरी,ज्योत्स्ना ठोंबरे,सुनंदा मुलमुले यासह जिल्हाभरातील हजारो आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित झाले होते.