Home Breaking News Akola city@ news • अकोला शहरात संस्कार भारतीच्या वतीने महर्षी वाल्मिकी...

Akola city@ news • अकोला शहरात संस्कार भारतीच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती साजरी !

555

Akola city@ news
• अकोला शहरात
संस्कार भारतीच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती साजरी !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

अकोला: संस्कार भारतीच्या वतीने नुकतीच महर्षी जयंती साजरी करण्यात आली.या आयोजित कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उमेश लखन तर प्रमुख पाहुणे म्हणून अकोला वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष बलबीर पारोचे यांची उपस्थिती लाभली होती. सदरहु कार्यक्रमाला वाल्मिकी युवा सेनेचे अध्यक्ष तथा विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष सुधाकर अंबुससकर,अकोला महानगरच्या अध्यक्ष चंदाताई जयस्वाल,प्रांत नाट्यविद्या संयोजक अशोक ढेरे, संगीत विद्या संयोजक श्री श्री किशन जयस्वाल, महानगर कार्याध्यक्ष, डॉ.वासंती थोते,नाट्यविद्या संयोजक आशाताई खोकले , सामाजिक सम रस्ता आयामचे संयोजक सारंग कारे , विवेक बिडवई श्रीमती कांचन गावंडे , छाया ठाकरे,प्रांजल रायपुरे, विजया खरोटे,सुरेखा फाटे, दिपाली जानोरकर आदिं उपस्थित होते.या नंतर कोजागिरी पौर्णिमेचा एक कार्यक्रम पार पडला.याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने मान्यवरांच्या उपस्थितीत अकोला शहरातील सामाजिक महिला कार्यकर्त्या तथा सुपरिचित साहित्यिक प्रांजल रायपुरे यांना संस्कार भारतीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले.