Home Breaking News Gadchiroli dist@ news•माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी सांभाळली ग्रामपंचायत...

Gadchiroli dist@ news•माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी सांभाळली ग्रामपंचायत प्रचाराची धुरा

136

Gadchiroli dist@ news
•माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी सांभाळली ग्रामपंचायत प्रचाराची धुरा !!

सुवर्ण भारत:शंकर महाकाली

अहेरी(गडचिरोली):-सध्या ग्रामपंचायत निवडणूका असल्याने गावांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.विविध पक्षाचे प्रमुख नेते आपल्या पॅनलच्या प्रचारात गुंतले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी यंदा प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ४ तारखेपासून आचारसंहिता लागणार असल्याने ३ नोव्हेंबर पर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी विविध गावांत जाऊन आपल्या उमेदवारांसाठी मैदान गाजविले.अहेरी उपविभागातही हीच परिस्थिती असून अहेरी,एटापल्ली,सिरोंचा आणि भामरागड सारख्या दुर्गम भागात विविध पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले.

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी यंदा विविध तालुक्यातील दुर्गम भागात जाऊन स्वतःचे पॅनल उभे करून प्रचाराची धुरा सांभाळली आहे.नुकतेच त्यांनी भामरागड तालुक्यातील निवडणुका असलेल्या ग्रामपंचायत अंतर्गत गावात कॉर्नर सभा घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.