Chandrapur dist@ news
• वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करू राजू झोडेंचा इशारा
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपुर:वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातच नागरिक व शेतकरी शेतमजूर असुरक्षित असून वाघाच्या हल्ल्यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मात्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून वाघाचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकरी आपल्या शेतात धान कापणी करायला जातात. तर गुरे चराईसाठी गुराखी जंगलात जात असून त्यांच्यावर वाघ हल्ले करत आहेत. २९ ऑक्टोंबरला विहिरगाव नियातक्षेत्रात मधुकर धाडसे या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले, तर निमधेळा नियातक्षेत्रात ३० ऑक्टोंबरला गुराखी सूर्यभान हजार या गुरख्याचा वाघाने बळी घेतला तसेच १ नोव्हेंबरला धानाच्या कापणीसाठी शेतात गेलेल्या हळदा येथील सायत्रीबाई कांबळी या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले.
शेतकरी, शेतमजूर घराबाहेर पडताच वाघ जीव घेत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आता तरी डोळे उघडतील का? वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला आदेश देतील का? असा सवाल उपस्थित करत वाघाचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.
