Home Breaking News • रास्त व प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी,गटप्रवर्तक व आशाचा संप...

• रास्त व प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी,गटप्रवर्तक व आशाचा संप 21 व्या दिवशी सुरुच ! •जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवू आयटकचा निर्धार

248

Chandrapur dist @news

• रास्त व प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी,गटप्रवर्तक व आशाचा संप 21 व्या दिवशी सुरुच !
•जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवू आयटकचा निर्धार

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:विविध रास्त मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी गटप्रवर्तक व आशा वर्कर्स आज दुपारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले.राष्ट्रीय आरोग्य अभियानात चार हजार गट प्रवर्तक व सत्तर हजार आशा वर्कर्स गेल्या १८वर्षां पासून कार्यरत असून त्यांच्या शासन दरबारी ब-याच मागण्या प्रलंबित आहेत.गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा , त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, सामाजिक सुरक्षा लागु करावी , किमान वेतन लागू करावे , या शिवाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या काही रास्त मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. विविध मागण्यांसाठी आयटकने संपावर जाण्याचा निर्णय या आधीच घेतला आहे.दरम्यान सुरू असलेल्या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेंकडों कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचारी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी झाल्याचे दिसून आले.उपरोक्त संप यशस्वी करण्याचे आवाहन आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे ,रविन्द्र उमाटे व आयटकच्या पदाधिका-यांनी या पूर्वीच केले आहे .आज झालेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अक्षरशः दणाणून गेला होता.