Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर नगरीत वाढतेय गुन्हेगारीचे प्रमाण अधिक! •पाच जणांनी...

Ballarpur city@ news • बल्लारपूर नगरीत वाढतेय गुन्हेगारीचे प्रमाण अधिक! •पाच जणांनी केली एका युवकाची हत्या! •शहरात उडाली खळबळ!

661

Ballarpur city@ news
• बल्लारपूर नगरीत वाढतेय गुन्हेगारीचे प्रमाण अधिक!
•पाच जणांनी केली एका युवकाची हत्या!
•शहरात उडाली खळबळ!

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

बल्लारपुर : चंद्रपूर जिल्ह्यातील
बल्लारपूर येथे दि.6 नोव्हेंबरला रात्रीच्या वेळेस बल्लारपूर शहरात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केली असल्याचे वृत्त आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक विद्या नगर वार्डातील पंचशील चौकात रात्रीच्या सुमारास 5 जणांनी पैश्याचा वादातून तोडसाम नामक युवकाला बेदम मारहाण केली, लाठी, फरशी व दगडाने त्या युवकावर अनेकदा प्रहार करण्यात आले, यामध्येच त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी लगेच धाव घेतली, हत्या प्रकरणातील 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये 2 महिलांचा समावेश असल्याचे बोलल्या जाते.बल्हारपूर पोलिस या घटनेबाबत अधिक चौकशी करीत असल्याचे कळते.