Home Breaking News Chandrapur city@ news •नवोदित कलावंतांच्या उपस्थितींने फुलले चंद्रपूरचे रेडक्रास भवन ! •चंद्रपूर...

Chandrapur city@ news •नवोदित कलावंतांच्या उपस्थितींने फुलले चंद्रपूरचे रेडक्रास भवन ! •चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कलाकारांची उपस्थिती!

92

Chandrapur city@ news
•नवोदित कलावंतांच्या उपस्थितींने फुलले चंद्रपूरचे रेडक्रास भवन !
•चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कलाकारांची उपस्थिती!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर :शहरात रविवारी दि.5 नोव्हेंबरला”प्रोडक्शन मुंबई” नागपूर ब्राॅंचचे वतीने स्थानिक रेड क्रॉस,भवनात नवोदित कलावंतांनाचे वेबसिरिज व आगामी चित्रपटासाठी ऑडिशन घेण्यात आले.दरम्यान या करिता स्वयंस्फूर्तीने विदर्भाच्या चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्यातील शेकडों कलावंत मोठ्या संख्येंने उपस्थित झाले होते.विशेष म्हणजे बालकलाकार देखील या ठिकाणी हजर झाल्याचे दिसून आले.नवोदित व अनुभवी कलाकारांनी आपले कौशल्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर काही नवोदित कलाकारांनी पहिल्याच वेळी सुरेख व सुंदर अभिनय सादर करुन आपली आगळी वेगळी छाप सोडली . चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात निर्मित होत असलेल्या व निर्मिती झालेल्या चित्रपटात काम करणांऱ्या अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शवून रंगमंचावर आपला अभिनय व कला या वेळी सादर केली.
सदरहु ऑडिशन मध्ये 100 कलाकारांनी आपला सहभाग नोंदविला होता .

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं मित्र परिवारचे सहसंयोजक राजेंद्र पचारे या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.आयोजित ऑडिशन मुळे निश्चितच नवोदित कलावंतांचे मनोबल वाढले आहे या वेळी अनेकांच्या चे-यावर एक वेगळा आनंद झळकत होता. अभिनय, नृत्य,गायन,कवी,आदिं कलावंतांचा सहभाग या निमित्ताने दिसून आला.

सदरहु ऑडिशन हे “तेजस प्रोडक्शन मुंबई ,नागपूर ब्राॅंचचे वतीने आयोजित करण्यात आले होते . संयोजक म्हणून ,राजेंद्र पचारे,शाम नागपुरे(फोटो ग्राफर),के.राजू.
यांनी अथक परिश्रम घेऊन या ऑडिशनचे आयोजन केले होते.

दरम्यान नागपूर ब्रांचचे अमोल दुर्गे हे प्रामुख्याने या वेळी उपस्थित होते संपूर्ण टीमचे प्रमुख डायरेक्टर, निर्माता,वेबसिरीज, चित्रपट निर्माते मुंबईचे सुनिल शिंदे हे काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही . दरम्यान चंद्रपूरचे जितू भाई दोषी यांना नवनिर्मित चित्रपटांविषयी अमाप आवड असल्यामुळे त्यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन नवोदित कलावंतांना शुभेच्छा दिल्या.चंद्रपूर शहरातील
चित्रपट लेखक व डायरेक्टर संजय शिवरकर हे देखील या वेळी आवर्जून उपस्थित होते.

राजुरा येथील नवोदित चित्रपट लेखक इकबाल भाई सिदिक्की यांची शेवटपर्यंत या ठिकाणी उपस्थिती लाभली होती.तर सुविद्या बांबोडे व त्यांच्या कन्यांचे विशेष सहकार्य लाभले होते.

रोटरी क्लबचे संचालक गलहोत व चंद्रपूरचे सत्यम पिपरे यांनी ऑडिशन साठी हॉल उपलब्ध करून दिला.चंद्रपूरचे श्याम नागपुरे यांनी ऑडिशनचे चित्रीकरण उत्तम रित्या पार पाडले .गणेश कार्लेकर व नरेश चतुरकर यांनी त्यांना मदत केली.

चंद्रपूरची नृत्य कलावंत तनूजा येरणे सह श्रध्दा सुरेश नंदेश्वर , भाग्यश्री राजू गोरडवार,पुनम भसारकर,परब गिरटकर,श्रेया मनोहर वसुकर,व अन्य कलावंतांनी सहभाग नोंदवित आपला अभिनय सादर केला.उपस्थित रसिक मंडळींनी त्यांचे कलेचे तोंड भरून कौतुक व अभिनंदन केले.