Chandrapur dist@ news
•राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिना निमित्त पार पडला भव्य कार्यक्रम!
• भद्रावतीत आरोग्य तपासणी शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
•व्हर्चुअस मल्टिपर्पज सोसायटीचा एक उपक्रम
भद्रावती
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
भद्रावती: तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असणा-या तदतवचं विदर्भात औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या भद्रावती शहरात व्हर्चुअस मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने काल मंगळवार दि.7 डिसेंबरला राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिना निमित्ताने मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग या शिवाय गर्भाशयाचा कर्करोग या संदर्भात जनजागृती सोबतच महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्याबाबतचे एक भव्य शिबिर पार पडले.
सदरहु शिबिरात गुप्तरोग तपासणी, एचआयव्ही तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी, सिबीसी, रक्तगट आणि अन्य आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन, चंद्रपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष बारब्दे, सूरज साळुंके, डॉ.ट्विंकल धेंगळे, काजल विश्वास, वैष्णवी सहारे, डी.एस.आर.सी. समुपदेशक राखी देशमुख,आयसीटीसी समुपदेशक शितल भडके, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तेजश्री दुर्योधन, डीआरपी रोशन आकुलवार, झोनल सुपरवायजर रूपाली मडावी, लिंक वर्कर अनिता वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या आरंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर व्हर्चुअस मल्टिपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन अशा प्रकारचे शिबीर जनतेसाठी आवश्यक ,गरजेचे व तेवढेच महत्त्वाचे असून ही संस्था अश्या शिबिरांचे आयोजन नेहमी करीत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
याच शिबिराच्या अनुषंगाने डॉ. आशिष बारब्दे यांनी कर्करोगा विषयी महत्वपूर्ण माहिती देऊन नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदरहु शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
त्यानंतर समुपदेशक राखी देशमुख यांनी स्री व पुरुषांमध्ये होणाऱ्या गुप्तरोग विषयी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
सदरहु शिबिरात कन्सर फाॅयटर बेला सम्युॅल व बादल यांनी उपस्थित राहुन आपले अनुभव कथन केले.
आयोजित कार्यक्रमाचे संचालन व्हर्च्युअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापिका किरण साळवी यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार कला कोडापे यांनी मानले.
आयोजित शिबिराला महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याचे किरण साळवी यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले.
