Home Breaking News varora taluka@ news • वरोरा शहरातील समस्याचे तत्काळ निराका रण करा,...

varora taluka@ news • वरोरा शहरातील समस्याचे तत्काळ निराका रण करा, अन्यथा आंदोलन छेडणार: भाजपायुमो

52

varora taluka@ news

• वरोरा शहरातील समस्याचे तत्काळ निराका रण करा, अन्यथा आंदोलन छेडणार: भाजपायुमो

✍️खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा (प्रती)गेल्या अनेक दिवसापासून शहरातील नागरिकांना विवीध समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे ,. मागील काही दिवसापूर्वी घाणीच्या साम्राज्यामुळे डेगुची साथ पसरली होती तर विवीध आजाराला नागरिकांना सामोरे जावे लागले,वरोरा नगर परिषद क्षेत्रातील विविध वार्डातील दैनंदिन कामाबाबत बऱ्याच समस्या उध्दभलेल्या आहेत त्यापैकीच
सर्व वार्डातील घंटागाडी ही रोज वेळेवर येत नाही, नाल्या सफाईचे काम थांबलेले आहे, त्यामुळे रोगराई पसरत आहे,मुख्य चौकातील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे,गणपती विसर्जनापासुन सार्वजनिक तलावाच्या भोवती अस्वच्छता निर्माण झाली, मुख्य मार्गातील दिवसे न दिवस वाढते अतिक्रमण गणेश मंदिर, वणी बायपास जवळ असलेले डॅम्पीक यार्डमध्ये अस्वच्छता पसरलेली आहे, शहरातील मेलेल्या जनावरांची योग्य विल्हेवाट न लावता वणी वरोरा बायपासवर टाकण्यात आलेली आहे, त्यामुळे रहदारीवरून येणाऱ्या सर्व नागरीकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे.वरील समस्याचे तात्काळ निवारण करण्यात यावे, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला असून दि.६/११/२०२३रोजी मुख्याधिकरी न. प वरोरा यांना निवेदन देण्यात आले यावेळी
संजय राम, सुरेश महाजन, डॉ. सागर वझे, त्रिशुल घाटे, विलास दारापुरकर ,राहुल बांदुरकर, अभय मडावी, अभिजीत गयनेवार,शरद मडावी, संदीप गांधी, राजु भोयर, अमोल बोडणे यश विनावेलर, अजय राखुंडे. यांची उपस्थिती होती.