Home Breaking News Chandrapur dist@ news • प्रियंका गायकवाडची युवा संसदेच्या क्रीडामंत्री पदी निवड! •मायाताई...

Chandrapur dist@ news • प्रियंका गायकवाडची युवा संसदेच्या क्रीडामंत्री पदी निवड! •मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे,रंज्जू मोडक,कु.किरण साळवी, अर्चना सुतार, सीमा पाटील, प्रांजल रायपुरे,अश्विनी दीक्षीत , सोनाली इटनकर यांनी केले प्रियंकाच्या निवडीचे स्वागत

115

Chandrapur dist@ news
• प्रियंका गायकवाडची युवा संसदेच्या क्रीडामंत्री पदी निवड!
•मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे,रंज्जू मोडक,कु.किरण साळवी, अर्चना सुतार, सीमा पाटील, प्रांजल रायपुरे,अश्विनी दीक्षीत , सोनाली इटनकर यांनी केले प्रियंकाच्या निवडीचे स्वागत

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर: युवा कार्यक्रम तथा खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य व युनिसेफ यांच्या संयुक्तीक विद्यमाने राज्यस्तरीय अभिरुप युवा संसद राज्यस्तरीय उपक्रम युवक वर्गांसाठी राबविल्या जात आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ३६ जिल्ह्यातुन ७२ संसद प्रतिनिधी येणार आहे.त्यापैकी २४ प्रतिनिधी हे मंत्रिमंडळ कार्य बघणार असुन उर्वरित संसद सदस्य म्हणून कार्य पाहणार आहेत.यात ग्रामिण भागातील चंद्रपूर जिल्ह्यातील शेगांव (खुर्द) येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेली , युवक, युवतींच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी लढणारी तथा विद्यार्थी व विद्यार्थीनी मध्ये प्रिय असणारी कु. प्रियंका पांडुरंग गायकवाड हिची युवा संसद लोकसभेच्या क्रीडामंत्री पदी नुकतीच निवड झाली आहे .येत्या १९ व २० नोव्हेंबरला राज्याचे राज्यपाल रमेश बैस व नेहरू युवा केंद्र संघटन , महाराष्ट्र -गोवा राज्य निर्देशक प्रकाश मनुरे तथा युनिसेफ महाराष्ट्र समन्वयक यांच्या उपस्थितीत ती प्रतिनिधित्व करणार आहेत.राज्यातील अभिरुप युवा संसद ही राजधानी मुंबई येथील विद्यापीठ कॅम्पस ,कलीना कॅम्पस सांताक्लूज येथे संपन्न होत आहे. २ दोन दिवस चालणाऱ्या या संसदेत विधिमंडळ राज्यभवन, विधानभवन,आणि मंत्रालयाच्या भेटी देखील या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. युवा संसद ही युवकांच्या माध्यमातून चालविली जाणार आहे. प्रियंका पांडुरंग गायकवाड हिची क्रीडामंत्री पदी निवड झाल्याबद्दल विठ्ठल हनवते, मोहित लभाने , स्वाती नन्नावरे ,शेखर भिवदरे, ग्रामसेवक शिरपुरकर,
मनोहर हनवते,अनिल चौधरी, मयुर गायकवाड, ब्रिजेश जिवतोडे,आशिष सुरेश हनवते आदिंनी तिच्या निवडीचे स्वागत केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे,‌अधिवक्ता मेघा धोटे,व्हर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या संस्थापक कु.किरण साळवी जेष्ठ साहित्यिक विजया भांगे , विजया तत्वादी, स्मिता बांडगे, सीमा पाटील, अश्विनी दीक्षीत, भावना मोडक, श्रूतिका नन्नावरे, संगिता पाटील, दीक्षा तेली, रिना तेलंग, मंथना नन्नावरे, सरोज हिवरे, नंदिनी लाहोळे, प्रांजली रायपूरे, कल्पना बनकर, दिपाली जाधव, सोनाली इटनकर, चैताली आतराम , श्रुति उरणकर, रजनी रणदिवे,कु.अर्चना सुतार,या शिवाय सहज सुचलं मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक व सहसंयोजिका वर्षा कोंगरे यांनी देखील प्रियंका गायकवाड यांच्या निवडीचे स्वागत व अभिनंदन केले आहे.