Home Breaking News Chandrapur dist@ news • कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 28...

Chandrapur dist@ news • कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 28 दिवस ! • शासनाने अद्याप घेतली नाही त्यांच्या रास्त मागण्यांची दखल!

163

Chandrapur dist@ news
• कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 28 दिवस !
• शासनाने अद्याप घेतली नाही त्यांच्या रास्त मागण्यांची दखल!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा आजचा 28 दिवस आहे.दरम्यान काल याच आंदोलनकर्त्यांनी चंद्रपूर शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते.हे सर्वश्रूतच आहे.जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घ्यायचे नाही असा निर्धार आंदोलनात उतरलेल्या आंदोलनकर्त्यांनी केला आहे .ऐन दिवाळीच्या सणात यांनी काळी दिवाळी व चटणी भाकर आंदोलन करुन चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले होते.दरम्यान या आंदोलनाला आंदोलनस्थळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देवून त्यांच्या रास्त मागण्या समजावून घेतल्या होत्या.आपण ह्या मागण्यां सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करु असे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.या मागण्यांची पूर्तता तातडीने न झाल्यास या पुढे हे आंदोलन तीव्र करु असा इशारा कृती समितीने दिला आहे.अभी नहीं तो कभी नहीं असे म्हणत चंद्रपूर जिल्ह्यातील शेंकडों कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात उतरले आहेत.