• यवतमाळात स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना “त्यांनी ” पत्र !
• आता तरी आमच्या मागण्यांची दखल घ्या हो ! चंद्रपूर
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
सध्या महाराष्ट्रभर कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रास्त मागण्यांसाठी आंदोलन सुरू असून आज विदर्भातील यवतमाळ मध्ये आंदोलनस्थळी आंदोलन कर्त्यांनी रक्तदान शिबिर घेवून त्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून ते मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविल्याचे वृत्त आहे.दिवसागणिक महाराष्ट्रात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष पुरवावे अशी आता सर्वस्तरावरुन मागणी होत आहे.


