Home Breaking News Ballarpur city @news • रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी...

Ballarpur city @news • रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे सविंधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा

174

Ballarpur city @news

• रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे सविंधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

बल्लारपूर :- शहरातील विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक बल्लारपूर येथील रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिना निमित्त झाशी राणी चौक विवेकानंद वार्ड येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे संस्थापक अध्यक्ष सौ. सुमनताई पुरूषोत्तम कळसकर, झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन जयंत कळसकर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भीम आर्मी चे शहर अध्यक्ष शशिकांत निरांजने, ॲड मेघा भाले, दिपक पडवेकर, बबलू करमरकर उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे सचिव सौ. प्राची प्रदीप झामरे, रतन बांबोळे, अशोक मेश्राम, नागेश रत्नपारखी, पुरूषोत्तम कळसकर, प्रदीप झामरे, ॲड. सुमित आमटे , प्रेम नगराळे, आदर्श मेश्राम, शुभांगी बांबोळे, डेशी थाॅमस, शांन्टु थाॅमस शाहिन शेख, सविता जावादे, शोभा अलोने,माया पडवेकर , मंजुताई नरांजे , सिमरन खोब्रागडे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते