Home Breaking News Chandrapur dist@ news •एका सेवानिवृत्त महसूल अधिका-याची पत्नी न्याय मिळण्यासाठी करतेय वारंवार...

Chandrapur dist@ news •एका सेवानिवृत्त महसूल अधिका-याची पत्नी न्याय मिळण्यासाठी करतेय वारंवार पत्रांव्दारे वरिष्ठांकडे पाठपुरावा ! •पण तिला खरोखरच न्याय मिळेल का ?

128

Chandrapur dist@ news
•एका सेवानिवृत्त महसूल अधिका-याची पत्नी न्याय मिळण्यासाठी करतेय वारंवार पत्रांव्दारे वरिष्ठांकडे पाठपुरावा !
•पण तिला खरोखरच न्याय मिळेल का ?

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:वरिष्ठ अधिकारी वर्गां कडून वेळीच आपल्याला योग्य न्याय मिळावा यासाठी अनेकदा वृध्द निर्मलाने धडपड केली .पण न्याय मिळाला नाही.शेवटी याच प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांची चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथे वास्तव्य करणाऱ्या कन्याने परत एकदा वरिष्ठांकडे पत्रव्यवहार सुरू केलेला आहे.ही महसूल विभागातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची पत्नी असून तिचे नांव प्रेमलता महावारीसिंह सोयाम असे आहे.तिची आई निर्मला अमरसिंह चव्हाण हिने दि.१७-२-२०१८ला रितसर लेखी अर्ज महसूल प्रशासनाकडे सादर केला होता.परंतू अनेक वर्षांचा कालावधी लोटून गेल्या नंतरही तिला न्याय मिळाला नाही.शेवटी दि. ११-४-२०२२ ला तिची प्राणज्योत मालवली.दिवंगत निर्मलाबाई चव्हाण ही मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी येथील रहिवाशी असून तिच्या मालकीची शेतजमीन अर्जुनी मोरगांव तालुक्यातील मौजा घोटी पळसगांव येथे आहे.त्या शेतीचा स.न.१५४ असून आराजी ०.९० हे .आर .आहे.याच शेतजमिनीत प्रामुख्याने धानाचे उत्पादन घेतल्या जाते .

दरम्यान सदरहु शेतजमिनीत अवैधरित्या पांदण रस्त्याची निर्मिती केल्यामूळे उपरोक्त शेतजमिनीतील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.हे नुकसान टाळण्यासाठी व आपणांस योग्य न्याय मिळण्यासाठी निर्मलाबाईने अर्जुनी मोरगांवचे तहसिलदार यांच्या कडे रितसर अर्ज सादर केला होता.पण तिच्या तक्रारीची वेळीच दखल घेण्यात आली नाही. ग्राम पंचायत ईसापूरने माझ्या मालकीच्या खासगी शेतजमीनीतून पांदन रस्ता काढला आहे.पांदण रस्ता तयार झाल्यामुळे या शेतीचे दोन भाग पडले आहे.याच संधीचा फायदा घेत शेजारच्या एका कास्तकारांने माझ्या काही जमीनीवर अतिक्रमण केल्याचे प्रेमलता सोयाम यांचे म्हणणे आहे.या सर्व प्रकाराला ग्राम पंचायत ईसापूर ही जबाबदार असल्याचा आरोप देखिल त्यांनी केला आहे.आपणांस नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.पण या प्रकरणातील चौकशी ही कासव गतीने सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.या मागचे खरे कारण काय असा सवाल देखिल त्यांनी उपस्थित केला आहे.

आपणांस या बाबतीत तातडीने योग्य न्याय मिळाला नाही तर आपण या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री व महसूल आयुक्त यांच्याकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी एका भेटी दरम्यान सांगितले.तदवतंच प्रेमलता सोयाम यांनी सातत्याने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,मग्रारोहयो जिल्हा परिषद गोंदिया यांच्या कडे पत्रव्यवहार सुरू ठेवलेला आहे.एव्हढेच नाही तर जमीनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेजारच्या कास्तकाराची अर्जुनी मोरगांव पोलिस स्टेशनला तक्रार सुध्दा दाखल केली आहे.सतत धडपड करणा-या या महसूल विभागातील एका सेवानिवृत्त अधिका-याच्या पत्नीला सदरहु प्रकरणात खरोखरच न्याय मिळेल का?