Home Breaking News Chandrapur dist@ news • घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन...

Chandrapur dist@ news • घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू ! • आंदोलनाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद !

143

Chandrapur dist@ news
• घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू !
• आंदोलनाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:ग्रामीण गृहनिर्माण योजना ही शासनाची अत्यंत महत्वाची व लक्षवेधी योजना असून रात्रंदिवस राबून वेळेत काम करणाऱ्या राज्य स्तरीय, विभाग स्तरीय, जिल्हा स्तरीय प्रोग्रामर व तालुका स्तरीय ऑपरेटर तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. घरकुल योजना-ग्रामीण च्या प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी मुळ मानधनामध्ये वाढ करणे व मागण्या पूर्ण करणेबाबत प्रधान सचिव, ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन दिले आहे . त्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी त्यांनी आज दि. 28 नोव्हेबर 2023 ला काम बंद आंदोलन पुकारले आहे.दरम्यान चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपुरचे प्रकल्प संचालक जिल्हा विकास यंत्रणा यांना देखील जिल्हास्तरीय प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी त्यांच्या कामबंद आंदोलन बाबत निवेदन सादर केले आहे.
केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचे संपूर्ण काम राज्य स्तर, विभाग स्तर, जिल्हा स्तर प्रोग्रामर व तालुका स्तर ऑपरेटर गेल्या कित्येक दिवसांपासून करीत आहेत. सर्व कर्मचारी यांचा अनुभव व वय बघता जॉब सुरक्षा बाबत विचार व्हावा व वयाच्या 58 वर्ष पर्यंत नोकरीची हमी मिळावी, ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या उमेद, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन व इतर सर्व विभामध्ये ज्याप्रमाणे HR Policy लागू केलेल्या आहे त्या सर्व आम्हाला तात्काळ लागू करून मिळाव्यात, मुळ मानधामध्ये एकुण 30 टक्के मानधन वाढ करावी, महिन्याच्या 5 तारखेच्या आत मानधन मिळावे, CSC e-Governance संस्थेमार्फत प्राप्त होणारे मासिक मानधन तपशील पाहता एकुण मुळ मानधनातून Gratuity, ESIC, PT, यांची मासिक रक्कम कपात केली जाते .यांच्या मासिक मुळ माधनातून PF, Gratuity, ESIC कपात न करता ती नियमानुसार संबंधित संस्थेने अदा करावी, शसकीय भरतीमध्ये आरक्षित राखीव जागा उपलब्ध करून द्याव्यात आदिं मागण्यां त्यांनी निवेदनात नमूद केल्या असून सदरहु मागण्या पूर्ण व्हाव्या या साठी त्यांना आज पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागला . महाराष्ट्र राज्यात घरकुल योजना- ग्रामीणचे कामकाज बंद करावे लागेल असा इशारा देखिल दिला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर यांना निवेदन देतांना जिल्हा प्रोग्रामच्या दिपाली जवळे, जिल्हा ऑपरेटर मीनाक्षी क्षीरसागर, तालुका ऑपरेटर नितीन वेलपुलवार, पल्लवी पराते, दर्शना बुरडकर, अंगद गुंडले, महेश शेळके, प्रकाश घडसे, स्वप्निल भगत, प्रणित बोबाटे,प्रफुल करपे, गौरव सोरते, राजेंद्र खोब्रागडे, सचिन भसारकर, सचिन बुरांडे,
पंकज झुरे, राजकुमार बावणे आदि उपस्थित होते.