Chimur taluka@ news
• ओबीसी समाजाच्या अन्नत्याग आंदोलनाला सोबत दुसऱ्या दिवशी पासून साखळी उपोषणाला सुरुवात..
•आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर
✍️शार्दूल पचारे
सुवर्ण भारतः तालुका प्रतिनिधी, चिमूर
चिमूर: राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू झाले असून आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. नागरिकांची भावना लक्ष्यात घेता आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर आहे
गुरुवार पासून चिमूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले असून शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलक अजित सूकारे व अक्षय लांजेवार यांच्या उपोषणाला पाठिंबा देत प्रभाकर पिसे श्रीहरी सातपुते राजकुमार मांथूरकर. प्रीतम वंजारी. अक्षय वंजारी यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाला भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर, विनोद अढाल,विवेक कापसे, शैलेंद्र पाटील,मनोज हजारे ईश्वर डुकरे,वर्षा शेंडे यांनी भेट दिली