युवा शेतकऱ्यांच्या कुटुंबावर कोसळले आभाळभर संकट
अपघातात दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू : पति पत्नीही गंभीर
सुवर्ण भारत :संतोष झाडे
गोंडपिपरी,प्रतिनीधी
गोंडपिपरी (घडोली):- दोन चिमुकले आई वडीलासह आजोबांच्या गावी जात असताना कार चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अन् होत्याच नव्हतं झाले.या कुटुंबातील लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा व आई वडील गंभीर जखमी झाले.या अपघातानंतर शनिवार ( ता.१) रोजी दुसऱ्याही मुलाचा मत्यू झाला.एका संपूर्ण कुटुंबावर संकटाच आभाळ कोसळणारी ही घटना गोंडपिपरी धाबा मार्गावर चेकसोमंनपल्ली जवळ घडली.याप्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे घडोलीसह संपूर्ण परिसरात शोकांची लहर पसरली आहे.
सुधीर चौधरी वय (३६) हे गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील रहिवासी आहेत.सुमन चौधरी वय (३०) हे त्यांची पत्नी असून धीरज चौधरी वय ( ५ ) व विरज चौधरी वय (२) अशी त्यांना दोन मुले होती. सुधीर चौधरी हे सासूरवाडी कुडेनांदगाव आणि धाबा येथील यात्रेस चौघेही आपल्या मोटरसायकलने घडोलीवरून निघाले होते.या दरम्यान चेक सोमनपल्ली जवळ पोहचताच समोरून येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली.अपघाताची माहिती कळताच डॉ.किशोर पेंढारकर हे ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळावर तातडीने पोहोचले. तपासणी केली असता विरज चौधरी यांचा मृत्यू झाला होता. प्रसंगाची गंभीरता लक्षात घेता तिघांना चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडील सुधीर व आई सुमन हे गंभीर जखमी झाले. त्यांचे पाय तुटले असून डोक्यालाही गंभीर इजा झाल्याने ते बेशुद्ध झाले.मुलगा धिरज यांची गंभीर अवस्था लक्षात घेता त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले.पण प्रवासादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.आई वडील बेशुद्ध असल्याने त्यांना या प्रकाराची माहिती कळाली नाही.