Home Breaking News • विवाह… दोन कुटुंबांसह संपूर्ण समाजाला बांधणारा पवित्र बंध – आ. किशोर...

• विवाह… दोन कुटुंबांसह संपूर्ण समाजाला बांधणारा पवित्र बंध – आ. किशोर जोरगेवार • महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाजाच्या वतीने उपवर-उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन

58
Oplus_16908288

• विवाह… दोन कुटुंबांसह संपूर्ण समाजाला बांधणारा पवित्र बंध – आ. किशोर जोरगेवार

• महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाजाच्या वतीने उपवर-उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

उपवर – उपवधू परिचय मेळावे ही आपल्या समाजासा

Oplus_16908288
Oplus_16908288

ठी अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. विवाह हा केवळ दोन व्यक्तींमधील संबंध नाही, तर दोन कुटुंबे आणि संपूर्ण समाजाला बांधणारा पवित्र बंध असतो. विवाह हे केवळ दोन हृदयांचे मिलन नसून, समान विचारधारा आणि परस्पर सहकार्याचा आधार असतो. आपल्या समाजात आदर्श विवाह घडावेत, कुटुंबसंस्था मजबूत राहावी यासाठी असे मेळावे मोलाचे कार्य करतात असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज रविवारी महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाजाच्या वतीने उपवर- उपवधू आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षक विभागाचे आमदार सुधाकर अडबाले, ज्योती राखुंडे, सतीश माणुसमारे, संतोष बोरिकर, रतन पोले, वासुदेव वांढरे, प्रभाकर नवघरे, प्रमोद मानुसमारे, प्रदीप जानवे, नरेंद्र बनकर, जगदीश दुधलकर, डॉ. राजेश शास्त्रकार, अरुणा मत्ते आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत आपण अनेक विकासकामे केली. ही विकासकामे करत असताना समाजाला उपयोग होईल याचा विचार केंद्रस्थानी राहिला. अनेक समाजांना समाजभवनासाठी निधी देण्याचे काम आपण केले आहे. सुतार (झाडे) समाजालाही समाजभवन निर्माण करायचे असेल आणि आपल्याकडे जागा उपलब्ध असेल, तर या जागेवर समाजभवन निर्माण करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी देणार, अशी घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
आपण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत. सरकारी योजनांचा लाभ, उद्योग-व्यवसायासाठी मदत आणि शिक्षणासाठी अधिक संधी निर्माण करण्यासाठी माझे पूर्ण सहकार्य समाजातील होतकरू युवकांना राहील. आपला सुतार (झाडे) समाज हा परिश्रम, कौशल्य आणि सचोटी यासाठी ओळखला जातो. आपल्या पूर्वजांनी लाकूडकलेचा आपल्याला एक महान वारसा दिला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपण या परंपरेला आधुनिकतेसोबत जोडून पुढे न्यायला हवे.
आपल्या समाजाने लाकूडकाम, गृहनिर्माण आणि फर्निचर व्यवसायात अमूल्य योगदान दिले आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्यवसाय अधिक प्रगत करता येईल. डिजिटल मार्केटिंग, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि नव्या यंत्रसामग्रीच्या मदतीने आपण आपला व्यवसाय जागतिक स्तरावर नेऊ शकतो. नोकरीच्या शोधात न थांबता आपणच नवीन संधी निर्माण करायला हव्यात. लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप आणि स्वयंपर्यायी व्यवसाय यात मोठी संधी आहे. टाकाऊपासून टिकाऊ, पर्यावरणपूरक फर्निचर असे नवे ट्रेंड आत्मसात करा,” असे आवाहन यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केले.या कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.