• चंद्रपूर येथे पालक मेळावा व वधू वर परीचय स्मरणिका पुस्तिका प्रकाशनाचे १७ फेब्रुवारीला आयोजन
सुवर्ण भारत: राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
चंद्रपूर : आजच्या धावपळीच्या जिवनात कोणालाच पुरेसा वेळ मिळत नाही. करीता ज्यांना समाजात फिरायला ओळखी करून घ्यायला, नाती सांभाळायला , माणसात बसायला, एकमेकांकडे जाणे येणे करून आपल्या कुटुंबा बद्दलची माहिती द्यायला वेळ मिळतं नाही त्यांच्यासाठी सोयीस्कर रित्या घेतलेला कार्यक्रम म्हणजे मेळावा त्यात वयात आलेली व विवाह करण्यायोग्य मुले मुली यांची ओळख , पसंती होते व हीत संबंध जोडले जातात या करीता आपल्या सोयीचे म्हणजे आपले हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र नाभिक महामंडळ चंद्रपूर द्वारा दि. .१७/०२/२०२५ रोज सोमवारला सकाळी ११वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रवि बेलपत्रे महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेश अध्यक्ष, कार्यक्रमाचे उद्घाटक चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष – वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती विजयराव वाटेकर नागपूर, अरुण जमदाडे प्रदेश चिटणीस महाराष्ट्र नाभिक महामंडळ, दीपकराव नक्षिणे प्रदेश संघटक महाराष्ट्र नाभिक महामंडळ, संजय माद्देशवार अध्यक्ष सलुन असोसिएशन यवतमाळ, सुरेश मांडवकर जेष्ठ कार्यकर्ता वणी, राजु वाटेकर अध्यक्ष संत नगाजी मंदिर ट्रस्ट वरोरा, भास्कर वाटेकर सामाजिक कार्यकर्ता राजुरा, प्रा. रविंद्र नलगिंटवार नाटक – लेखक आनंदवन वरोरा, देवेंद्र कडवे अध्यक्ष संत नगाजी मंदिर ट्रस्ट चिमुर, रमेश नक्षिणे नाभिक ज्येष्ठ कार्यकर्ता गडचिरोली, राजेन्द्र नागतुरे नाभिक समाज युवा मार्गदर्शक यवतमाळ, दत्तुभाऊ कडुकर ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रपूर, मुर्लीधर चौधरी ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रपूर, संतोष मोतेवार सलुन असोसिएशन जिल्हा सचिव यवतमाळ, राहणार आहे.
या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती म्हणून मा. डॉ. सुधिर मुनगंटीवार (माजी वनमंत्री, सांस्कृतिक मंत्री तथा आमदार विधानसभा बल्लारपूर), विजय वडेट्टीवार ( माजी विरोधी पक्षनेते, माजी पालकमंत्री तथा आमदार विधानसभा ब्रम्हपुरी), किशोर जोरगेवार (आमदार विधानसभा चंद्रपूर), बंटि बांगडिया (आमदार विधानसभा चिमुर), देवराव भोंगळे (आमदार विधानसभा राजुरा),करण देवतळे (आमदार विधानसभा भद्रावती-वरोरा ), संजय देरकर (आमदार विधानसभा वणी), यांचा सत्कार करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेन्द्र भानोसे (चंद्रपूर) व कु. शेंडे (बाबुपेठ )प्रास्ताविक रवि येसेकर (चंद्रपूर) हे करतील.
तरी सर्व नाभिक समाज बांधव, भगिनी, पालक आणि सर्व उपवर – उपवधु यांनी या पालक मेळावा व उपवर – उपवधु स्मरणिका पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तरी ज्यांना कोणास उपवर- उपवधु यांचा बायोडाटा फोटो, कवीता, समाजा विषयी लेखक स्मरणिका पुस्तिकांमध्ये प्रकाशीत करायचे असेल तर दि. १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत संपर्क -9011157757, 8669195612 या क्रमांकावर पाठवावे. तरी याकार्यक्रमास आपली मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून सहकार्य करावे असे महाराष्ट्र नाभिक महामंडळ चंद्रपूर जिल्हा कमेटी आयोजक रवि येसेकर (जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर), संतोष नापीत (जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर), देवेंद्र वाटकर ( जिल्हा कार्याध्यक्ष बल्लारपूर), अजय खडसिंगे (जिल्हा कार्याध्यक्ष ब्रम्हपुरी),मनोज पिजदुरकर (जिल्हा सचिव चंद्रपूर),अरुण चिंचोलकर (उपाध्यक्ष चंद्रपूर), विश्वंभर मांडवकर (कोषाध्यक्ष चंद्रपूर), सचिन नक्षिणे (युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष भद्रावती), अर्पीत मधुकर नक्षणे ( जिल्हा संघटक चंद्रपूर) यांनी केले आहे.