Home Breaking News Mul taluka@ news • मूल शहरातील नागरी प्रश्नावर प्रशासनाची आढावा बैठक, मूल...

Mul taluka@ news • मूल शहरातील नागरी प्रश्नावर प्रशासनाची आढावा बैठक, मूल सोशल फोरमच्या मागण्यांवर झाली चर्चा

83

Mul taluka@ news
• मूल शहरातील नागरी प्रश्नावर प्रशासनाची आढावा बैठक, मूल सोशल फोरमच्या मागण्यांवर झाली चर्चा

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मूल: शहरातील नागरी प्रश्नावर प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत अनेक विषयावर चर्चा करून समाधानकारक निर्णय घेण्यात आले. मूल सोशल फोरमने शहरातील नागरी प्रश्नाकडे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. या निवेदनाचे अनुषंगाने नामदार मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी प्रशासकीय अधिकार्यांची आढावा बैठक घेतली.

मूलचे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी, नामदार मुनगंटीवार यांचे विशेष कार्यसन अधिकारी संजय राईंचवार, मुख्याधिकारी यशवंत पवार, संवर्ग विकास अधिकारी बी.एच. राठोड, मूल उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लाडे, उपअधिक्षक भुमीअभिलेखचे सुधिर लव्हाडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मेश्राम, मग बस स्थानकाच्या वाहतूक निरीक्षक विभा बोथले, मूल सोशल फोरमचे मुख्य संयोजक विजय सिध्दावार उपस्थित होते.
मूल—नागपूर सकाळी 6.30 वाजताची बस सुरू करणे, चंद्रपूर मूल गडचिरोली रात्रौ 9.30 वाजताची बस सुरू करणे, नांदगाव चांदापूर मूल सकाळी 7.30 वाजताची बस सुरू करणे, मूल जानाळा पोंभूर्णा मार्गावर दुपारी 12 वाजताची बस नियमीत चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मूल येथील मंजूर बस आगाराचे प्रस्तावित जागेवर रस्त्याची अडचण असल्यांने, याबाबत जिल्हाधिकारी यांचेसोबत बैठक आवश्यक असल्यांचे मत यावेळी व्यक्त केले.

मूल येथील कर्मवीर क्रिडांगणावर प्रकाश व्यवस्था करण्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी पवार यांनी मान्य केले, तर या मैदानावर भरत असलेले भाजी बाजार शहरातील आठवडी बाजाराचे काम पूर्णत्वास झाल्यानंतर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मैदानावर फिरायला, व्यायाम करायला जाणार्यांना वन्यप्राण्यांपासून धोका होवू नये याकरीता वनविभागाची मदत घेता येईल यावरही चर्चा करण्यात आली.

बैठकीत मूल येथे मंजूर असलेल्या 100 बेडचे रूग्णालयाचे कामाचा आढावा घेण्यात आला, तसेच मूल शहरातील वळण मार्गाचा (बायपास)च्या कामाचाही आढावा घेवून, काम सुरू करण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. आजच्या बैठकीत मूल सोशल फोरमचे अमित राऊत, कुमूदिनी भोयर, नंदीनी आडपवार, धर्मेंद्र सुत्रपवार, भावना चौखुंडे, निकीता झुरमूरे उपस्थित होते.