Chandrapur dist@ news
•सहज सुचलं सखी मंच व्हाॅट्सअप गृपच्या संयोजिका पदी अदिती वानखडे यांची नियुक्ती तर सहसंयोजिका पदी प्राजक्ता पाठेंची निवड !!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपुर:कला, साहित्य ,सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करणारा व त्यांच्या कलागुणांना सदैव चालना देणारा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं सखी मंच व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिकापदी अकोला निवासी अदिती सुधाकर वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर याच गृपच्या सहसंयोजिका पदी अमरावती जिल्ह्यातील अंजनगांवसुर्जी येथील रहिवाशी प्राजक्ता ज्ञानेश्वर पाठे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे . महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या जेष्ठ मार्गदर्शिका मायाताई कोसरे व राजूरा निवासी अधिवक्ता मेघा धोटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली (सहज सुचलं सखी मंच )असे नांव धारण करणाऱा सहज सुचलंचा हा एक व्हाॅट्सअप गृप आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या या दोघींही उच्च शिक्षित असून त्या सामाजिक बांधिलकी जपणा-या महिला कार्यकर्त्या आहे.
◆अदिती वानखडे व प्राजक्ता पाठेंचे अभिनंदन !
दरम्यान सहज सुचलं सखी मंचच्या संयोजिका पदी अदिती वानखडे व सहसंयोजिका पदी प्राजक्ता पाठे यांची निवड झाल्याबद्दल मराठी फिल्म अभिनेत्री मनिषा बि-हाडे, पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा मडावी,महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य जेष्ठ मार्गदर्शिका उपराजधानी निवासी मायाताई कोसरे , चंद्रपूर प्रख्यात साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, भद्रावतीच्या व्हॅर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी, चंद्रपूर -गडचिरोली ह्या जुळ्या जिल्ह्याच्या सहज सुचलं गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका वर्षा कोंगरे, जागतिक पुरस्कार प्राप्त पाचवडच्या प्रख्यात कवयित्री कु. अर्चना सुतार , बारामतीच्या अश्विनी दीक्षित ,अकोल्याच्या प्रख्यात लेखिका प्रांजल रायपूरे, सोनाली इटनकर, चैताली आतराम, सरोज हिवरे, विजया तत्वादी, स्मिता बांडगे, विजया भांगे, सरोज हिवरे, नंदिनी लाहोळे, पायल दुपारे, रश्मी पचारे, श्रूतिका नन्नावरे, भावना मोडक, सीमा पाटील, श्रुति उरणकर, वैशाली राऊत, रिना तेलंग, वर्षा आत्राम, दीक्षा तेली, संगिता पाटील, रेखा कुमरे,व अन्य सदस्यगणांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
येत्या १जानेवारीला सहज सुचलं गृप दहाव्या वर्षात थाटात पदार्पण करीत असल्याचे मायाताई कोसरे यांनी या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरुन आज सकाळी बोलताना सांगितले.