Home Breaking News ⬜🟨… दानधर्म….⬜🟨 🏵️⬜सौ. ऋचा हनुमंत महाबळ, सहज सुचलं सदस्य सिंधुदुर्ग

⬜🟨… दानधर्म….⬜🟨 🏵️⬜सौ. ऋचा हनुमंत महाबळ, सहज सुचलं सदस्य सिंधुदुर्ग

57

⬜🟨… दानधर्म….⬜🟨

🏵️⬜सौ. ऋचा हनुमंत महाबळ, सहज सुचलं सदस्य सिंधुदुर्ग

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मानवी जीवनात आपण नेहमीच स्वार्थीपणे वागतो, आपला हव्यास काही संपत नाही, संसारात आपण इतके गुरफटलेले असतो की काहीतरी सतकृत्य करावे ज्याने थोडे तरी पुण्य पदरी बांधू.

दानधर्म म्हंटल्यावर मला कर्ण व बालीची आठवण झाली, दान वीर कर्ण याची सर्वांनाच माहीती आहे, आपल्याकडे आलेल्या याचकाला कधीच विन्मुख पाठवत नसे, प्रत्यक्ष श्रीकृष्ण सांगतात की जगात कर्णा सारखा दानी कोणीही नाही त्यांना कवच व कुंडले असल्यामुळे त्यांना अमरत्व प्राप्त झाले होते त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती, इंद्राने
विप्राचे रूप घेऊन आपले मागणे सांगितले त्या बरोबर खंजीर घेऊन आपल्या शरीरातील कवच व कुंडले काढून दिली कोणताही विचार न करता तसेच कुंती पुत्र असूनही त्याला मान मिळाला नाही कुंतीने युद्धात मुलांसाठी याचना केली तेंव्हा अर्जुनाशिवाय मी कुणाला मारणार नाही हे वचन दिले असा कर्ण पुन्हा होणे नाही.

तसेच दुसरे उदाहरणं सांगायचे झाले तर असुरेश्वर बाली याचे, प्रल्हादचा नातू व विरोचनाचा पुत्र, तो व पत्नी विष्णू भक्त होते. त्याचा पराक्रम, त्याग व तपश्र्चर्या पाहून इंद्र घाबरला आपले सिंहासन धोक्यात आहे हे पाहून त्याने वामनाचे रूप घेतले व मला तीन फुटयांच्या मापाने दान दे सांगितले तेंव्हा वामनाने एक पाय ठेवून पृथ्वी दुसरा पाय ठेवून स्वर्ग, तिसरा पाय बालीच्या डोक्यावर ठेवला व सर्व मालमत्ता त्याच्या कडून लुबाडली हे दान फसवणूकीने घेतले गेले. म्हणून दान हे निःस्वार्थ भावनेने, कपट न करता सढळहस्ते करावे, दान हे सत्पात्री असावे त्याचा गैर वापर होऊ नये तसेच दान दिलेले या कानाचे त्या कानाला कळू नये असे म्हणतात. आजकाल नैसर्गिक आपत्ती येत असते आपण अन्न, कपडे, धान्य, पैसे विविध रूपात दान करतो ते दान योग्य जागी व गरजवंताला मिळणे गरजेचे आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे.