Chandrapur dist@ news
• टॉपिक सिग्नल मूळे होतोय वाहनधारकांना अधिकचा त्रास; पोलिस अधिक्षकांनी लक्ष पुरवावे या कडे!
•राजू झोडें सह अनेकांनी केली मागणी
सुवर्ण भारत
चंद्रपूर: किरण घाटे (सहसंपादक)
चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प चौकात ट्राॅफिक सिग्नल असून या ट्राॅफिक सिग्नलमुळे मूल व बल्लारपूरकडे जाणाऱ्या वाहनधारकांस मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याची दखल तातडीने वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी राजू झोडे यांनी आज केली आहे
स्थानिक बंगाली कॅम्प चौकात असलेले ट्राॅफिक सिग्नल हे 20 सेकंदाचे असून त्यामुळे मूल व बल्लारपूरकडे जाणारे वाहने पूर्णतः सिग्नल पार करू शकत नाही. ते 40 सेकंदाचे करावे.20सेकंदाचे असल्याने याचाच फायदा वाहतूक पोलिस नेमका घेत आहे.कधी कधी तर वाहन धारकांना ते आर्थिक दंड लावतात .याची नोंद वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांने घ्यावी अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे
सदरहु मागणीचे निवेदन आज वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले.निवेदन देताना राजु झोडे ,रमेश पिटल्यवार श्याम झिलपे ,राहुल गायकवाड़ आदिं उपस्थित होते.चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक रविन्द्रसिंह परदेशी यांनी देखील या समस्येकडे तातडीने लक्ष पुरवावे .अशी अपेक्षा सर्व सामान्य जनतेंनी व्यक्त केली आहे.