Jivti taluka@ news
• सुदाम राठोड यांचा गांववासियां कडून सत्कार
सुवर्ण भारत
चंद्रपूर :किरण घाटे (सहसंपादक)
जिवती तालुक्यातील पेदाआसापूर या गावातील सुदाम रामराव राठोड यांनी मागील नऊ दिवसांपासून जिवती तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना शेत जमिनीचे पट्टे मिळावे या साठी उपोषण केले होते .त्यांच्या सोबत सुग्रीव गोतावळे, शब्बीर जहागीरदार, विनोद पवार, मुकेश चव्हाण, दयानंद राठोड, लक्ष्मण मंगाम, प्रेम चव्हाण, विजय गोतावळे, बालाजी वाघमारे हे देखिल उपोषणाला बसले होते . दरम्यान राज्याचे वनमंत्री यांच्यासोबत बैठक लावून या संदर्भात उपोषणकर्त्यांना आश्वासन मिळाले. त्यामुळे हे उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले. उपोषणकर्ते सुदाम राठोड व अन्य उपोषणकर्ते स्वगावी गेल्या नंतर त्यांचा गावकरी मंडळी कडून सत्कार करण्यात आला.