Home Breaking News Chandrapur dist@ news •सुरेश डांगेंची म.रा.प्रा.शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्षपदी निवड •अनेकांनी...

Chandrapur dist@ news •सुरेश डांगेंची म.रा.प्रा.शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्षपदी निवड •अनेकांनी केले डांगेंचे अभिनंदन

39

Chandrapur dist@ news
•सुरेश डांगेंची म.रा.प्रा.शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्षपदी निवड
•अनेकांनी केले डांगेंचे अभिनंदन

सुवर्ण भारत
चंद्रपूर :किरण घाटे

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन शिक्षकांच्या न्यायासाठी लढणा-या शिक्षक भारती संघटनेची नागपूर आणि अमरावती विभागाची सहविचार सभा आमदार कपिल पाटील यांचे उपस्थितीत नागपूर येथील लोहिया अध्ययन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड,राष्ट्र सेवा दल विश्वस्त अतुल देशमुख,राज्य कार्याध्यक्ष अर्जून कोकाटे, शिक्षक भारती राज्य कार्याध्यक्ष दिनेश खोसे,राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर,माध्यमिक विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,अमरावती विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम ठोकळ, ऍड. शरद कोकाटे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण फाळके,गोंदिया जिल्हाध्यक्ष सुशिलकुमार बन्सोड,भंडारा जिल्हाध्यक्ष रवींद्र पटले,गडचिरोली जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख,यवतमाळ जिल्हाध्यक्ष गजानन पवार, नलिनी नागरिकर,गुलाबराव मौदेकर,संजय मेश्राम आदी उपस्थित होते.या सहविचार सभेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. कंत्राटीकरण,खाजगीकरण, शाळा बंद धोरण यांचे विरोधात लवकरच शिक्षक भारती राज्यव्यापी लढा उभारणार असल्याचे सुतोवाच राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी केले. आमदार कपिल पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या सहविचार सभेत सुरेश डांगे यांची सर्वानुमते नागपूर विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.शिक्षक भारतीच्या सुरुवातीच्या काळापासूनच सुरेश डांगे शिक्षक भारतीचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.शिक्षक भारती संघटनेत त्यांनी तालुका,जिल्हा, विभागीय पातळीवर विविध पदावर कार्य केले आहे.शिक्षक भारतीच्या विविध आंदोलनांत त्यांनी सहभाग घेतला आहे.आमदार पाटील यांचे मार्गदर्शनात व राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांचे नेतृत्वात त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे.सामाजिक,साहित्य,शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यांत सक्रिय असणाऱ्या डांगे यांची काही पुस्तके प्रकाशित आहेत.

निवडीबद्दल डांगे यांनी आमदार पाटील,राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड,कार्याध्यक्ष दिनेश खोसे,उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर यांचे आभार मानले आहेत.त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.सहविचार सभेचे प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर यांनी केले.संचालन सुरेश डांगे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार शरद काकडे यांनी मानले.