Home Breaking News Chandrapur city@ news •‌चंद्रपूरातील कर्तव्य सेतु केंद्र बनले वयोवृद्ध व निराधारांचे आधार...

Chandrapur city@ news •‌चंद्रपूरातील कर्तव्य सेतु केंद्र बनले वयोवृद्ध व निराधारांचे आधार – आ. किशोर जोरगेवार •आ.जोरगेवारांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; शेकडों तरुणांनी केले रक्तदान!

84

Chandrapur city@ news
•‌चंद्रपूरातील कर्तव्य सेतु केंद्र बनले वयोवृद्ध व निराधारांचे आधार – आ. किशोर जोरगेवार
•आ.जोरगेवारांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; शेकडों तरुणांनी केले रक्तदान!

सुवर्ण भारत
चंद्रपूर: किरण घाटे

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कर्तव्य सेतु केंद्राला एक वर्ष पूर्ण झाले आहे. नागरिकांना विविध शासकीय योजनांचे प्रमाणपत्र नि:शुल्क तयार करण्याच्या हेतूने आपण हे सेतू केंद्र सुरु केले होते. आज या सेतू केंद्राच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना निराधार, श्रावणबाळ प्रमाणपत्र काढून दिले आहे. याचे वाटप करतांना आनंद होत आहे. हे सेतू केंद्र सुरु करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे समाधान मला असून सदरहु कर्तव्य सेतु केंद्र हे वयोवृद्ध आणि निराधारांचे आधार बनले असल्याचे मत चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.
आज आ. जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त निराधार प्रमाणपत्र राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणचा कार्यक्रम यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला चिपळून मतदार संघाचे आमदार शेखर निकम, चंद्रपूर तहसिल कार्यालयाचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार राजू धांडे, माता महाकाली महोत्सव समीतीचे उपाध्यक्ष अधिवक्ता विजय मोगरे, डॉ. हर्षवर्धन दिक्षीत, राजेंद्र सूर्यवंशी, कल्याणी किशोर जोरगेवार, माजी नगर सेविका सुनिता लोढीया, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगांवकर आदींची उपस्थिती लाभलीऋ होती.
वयोवृध्द आणि विधवा महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र माहिती अभावी किंवा शासकीय दिंरगाईमुळे या योजनेंपासून त्यांना वंचित राहावे लागते. योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावावर अनेकांची आर्थिक फसवणुकही झाली आहे. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अशा महिलांसाठी आपल्या कार्यालयात आपण कर्तव्य सेतु केंद्र सुरु केले. या सेतुच्या माध्यमातून आपण विविध योजनांची जनजागृती करत पात्र लाभार्थ्यांना नि:शुल्क कागदपत्र तयार करुन देत योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सुरु केले होते. यामाध्यमातून शेकडों महिलांना आपण निराधार प्रमाणपत्र, श्रावणबाळ योजनेचे प्रमाणत्र, , उत्पन्न प्रमाणपत्र, यासह अनेक महत्वांचे कागदपत्र नि:शुल्क उपलब्ध करुन दिले असल्याचे आ.जोरगेवार यावेळी म्हणाले. आपल्या हक्काच्या या सेतू केंद्राचा आपण लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

आ.जोरगेवार यांची नाळ जनतेशी – आ. शेखर निकम
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मी येथे आलो. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेल्या गर्दीतून ते लोकाभिमुख नेते आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय मला आला. त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून जनता आणि त्यांच्यामधील नाते बळकट केले आहे. अनेक जनउपयोगी उपक्रम ते राबवित असतात. त्यांच्या याच कार्यामुळे ते अपक्ष म्हणून एवढ्या मोठ्या मतदारधिक्याने निवडुन आले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमात शेकडों लाभार्थ्यांना निराधार प्रमाणपत्रांचे व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सदरहू कार्यक्रमाला शेकडों लाभार्थ्यांची उपस्थिती होती. आजच्या कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जिवणकर यांनी केले.
●विविध धर्मीय धार्मिक स्थळी प्रार्थना●!
आमदार जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त यंग चांदा ब्रिगेड व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील विविध धार्मिक स्थळी, प्रार्थना, वंदन, पुजा, महाप्रसाद आणि आरती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील मस्जिद, चर्च, दिक्षाभुमी, गुरुद्वारा आणि मंदिर येथे सदरहु कार्यक्रम पार पडले. यावेळी मंदिरांमध्ये महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
●शेकडो युवकांनी केले रक्तदान●!
चंद्रपूरचे आमदार (आ .जोरगेवार) यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या युवा आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता आमदार जोरगेवार यांनी सदरहु रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरा मध्ये शेकडों रक्तदात्यांनी रक्तदान करत आमदार किशोर जोरगेवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
●विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन●!
आमदार जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त बस स्थानक परिसरात ऑटो संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 30 वर्षांपासून ऑटो चालवीत आपल्या परिवाराचा उदरर्निवाह करत असलेल्या ऑटो चालकांचा सेवा सार्थी म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला. बाबपूठे येथील वॉटर फिल्टरचे ही आमदार
जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यासह विविध सामाजिक कार्यक्रम थाटात पार पडले.