Home Breaking News •अकोल्यात थाटात पार पडले “अजेय” महिलाशक्ती संमेलन! •संमेलनाला लाभली अनेक मान्यवरांची...

•अकोल्यात थाटात पार पडले “अजेय” महिलाशक्ती संमेलन! •संमेलनाला लाभली अनेक मान्यवरांची उपस्थिती!

34

•अकोल्यात थाटात पार पडले “अजेय” महिलाशक्ती संमेलन!

•संमेलनाला लाभली अनेक मान्यवरांची उपस्थिती!

सुवर्ण भारत
चंद्रपूर :किरण घाटे

विदर्भाच्या अकोला शहरातील खंडेलवाल महाविद्यालयाच्या पद्मानंद सभागृहात रविवार दि. 17 डिसेंबरला सकाळी 9-30 ते दुपारी 3-00 वाजेपर्यंत
अजेय महिलाशक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. थाटात पार पडलेल्या या संमेलनाला सुपरिचित उद्योजिका प्रमुख अतिथी म्हणून स्नेहल ढवळे या प्रामुख्याने उपस्थित होत्या तर ह्याच संमेलनाला प्रमुख वक्त्या म्हणून पूर्वा थोरात लाभल्या होत्या . वक्त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितीतांना या वेळी मोलाचे मार्गदर्शन केले.उपरोक्त महिला संमेलनाला मार्गदर्शिका म्हणून विदर्भ समन्वयक मीरा कडबे उपस्थित होत्या त्यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले.
अजय महिलाशक्ती संमेलनाला विशेष अतिथी म्हणून विश्व मांगल्य सभा राष्ट्रीय अध्यक्ष रेखा खंडेलवाल प्रामुख्याने उपस्थित होत्या .या शिवाय अकोला महानगर विश्व मांगल्य अध्यक्षा स्वाती झुनझुनवाला हजर होत्या.दरम्यान अकोला मुक्कामी पार पडलेल्या ह्या भव्य अजेय महिलाशक्ती संमेलनाच्या आयोजिका आरती लढ्ढा ह्या होत्या.
आर्थिक ,सामाजिक ,व सांस्कृतिक विकास साध्य करण्यासाठी महिलांची भुमिका ही महत्वाची असते. त्या एकत्रित येण्यास व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या मुळ हेतूने देशभरात आयोजित करण्यात आलेल्या जवळपास 400 संमेलन पैकी हे एक महत्त्वाचे संमेलन अकोला शहरात नुकतेच पार पडले .संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ,चर्चासत्र, वस्तूंच्या विक्री , प्रदर्शनाचे स्टॉल्स, व लघु उद्योजकांचे स्टॉल्स संमेलन स्थळी लावण्यात आले होते .या संमेलनात तीन महत्त्वपूर्ण सत्र झालीत .ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक , शैक्षणिक , स्वास्थ ,महिला सुरक्षा ,आदिं विषयांचा समावेश होता. विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले.
अकोला जिल्ह्य़ातील १५८० महिलांनी या संमेलनात आपला सहभाग नोंदविला होता . आयोजित अजेय महिलाशक्ती संमेलन यशस्वी करण्याकरिता अनेकांचे सहकार्य लाभले.

विश्व मांगल्य सदाचारसभा यांच्याकडे भोजन व्यवस्थेचे नियोजन होते.तर जुने शहर अकोला यांच्याकडे संमेलनाची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यांना
कैलास नगर, निवारा गायत्री नगर ,शास्त्रीनगर ,पत्रकार कॉलनी, मुकुंद नगर ,जठार पेठ
यांचे सहकार्य लाभले.