Home Breaking News Chandrapur city@ news • “त्या “दोषींवर कारवाई करा -अन्यथा आंदोलन करु आपचा...

Chandrapur city@ news • “त्या “दोषींवर कारवाई करा -अन्यथा आंदोलन करु आपचा इशारा

97

Chandrapur city@ news
• “त्या “दोषींवर कारवाई करा -अन्यथा आंदोलन करु आपचा इशारा

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर शहर नजिकच्या बल्लारशा बायपास महामार्गावरील अष्टभूजा बाबूपेठ मध्यभागी असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम मागील पाच ते सहा वर्षांपासून रखडल्यामुळे या ठिकाणी अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. इतकेच नाही तर दोन महिन्यां पूर्वी झालेल्या एका अपघातात चार निष्पाप लोक मृत्युमुखी पडले होते.हे सर्वश्रूतच आहे.
दरम्यान आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी या अपघाता बाबत बांधकाम विभाग तथा टोल कंपनीला दोषी ठरवले असून ते म्हणाले की, सदरहु ब्रिजचे काम पूर्ण करण्याची पूर्णता जबाबदारी ही वरोरा चंद्रपूर बल्लारपूर टोल रोड (WCBTRL) कंपनीची आहे.परंतू उपरोक्त टोल कंपनी ही याकडे डोळेझाकपणा करीत आहे. सोबतच बांधकाम विभागाने देखील दोषी असणा-या टोल कंपनीला संरक्षण देण्याचे काम आज पर्यंत केलेले आहे.
या संदर्भात आम आदमी पार्टीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व रामनगर पोलिस स्टेशनला पुराव्यासह तक्रार केलेली आहे .पण अद्याप दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
◆अश्या आहेत आपच्या मागण्या◆ !

दोषीवरती भादवि कलम 304,व 308 अनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

अपघातात मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयें तर जखमींना पाच लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे

सदरहु ब्रिजचे काम एक महिन्याच्या आत तात्काळ सुरू करण्यात यावे .

ब्रिज पासून तर कामगार चौक पर्यंत सर्विस रोड देण्यात यावे.

पोंभूर्णा मार्गे येणारी विरुद्ध दिशेची जड वाहतूक त्वरित थांबवावी.

आंबेडकर चौक या ठिकाणी मोठे स्क्वेअर लाॅईट लावण्यात यावे.उपरोक्त मागण्यांची येत्या 10 दिवसांत पूर्तता न झाल्यास किंवा लेखी स्वरूपात पत्र न दिल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने चंद्रपूरात तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा राजू कुडे यांनी स्थानिक प्रशासनाला दिला आहे.