Bhadrawati taluka@news
• आ.प्रतिभाताई धानोरकर यांच्या आश्वासनानंतर झोपडपट्टी विकास संघटने चे आंदोलन मागे
✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : ता.प्र.भद्रावती
भद्रावती :- शहरातील ऐतिहासिक डोलारा तलावाला संरक्षण भिंत बांधून त्याचे खोलीकरण व सौदरीकरण करावे या मागणीसाठी येथील नगर परिषद समोर सुरू असलेल्या उपोषणाची आ. प्रतिभाताई धानोरकर यांच्या आश्वासनानंतर शनिवारी सांगता करण्यात आली.
डोलारा तलाव परिसरातील झोपडपट्टी धारकांना नियमाकूल करून त्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे या मागण्यांना घेऊन झोपडपट्टी विकास संघटने द्वारे संघटनेचे अध्यक्ष राहुल सोनटक्के यांच्या नेतृत्वात मुंडन करून नगरपरिषद कार्यालयाजवळ आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. उपोषणाच्या चौथ्या दिवशी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन राहुल सोनटक्के यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली व त्यांच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर राहुल सोनटक्के यांना नारळ पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
डोलारा तलावाची संरक्षण भिंत, त्याचे खोलीकरण व सौंदर्य करण्यासाठी 30 कोटीचा प्रस्ताव शासनाला पाठविला असून शासनातर्फे तो अद्याप मंजूर करण्यात आला नसल्याचे यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले. तलावाच्या आउटलेट साठी वाढीव रकमेचा प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले. अतीक्रमनधारकांच्या बहुतांश जमीनीची मोजणी करण्यात आली असून त्यातील काही मोजणी बाकी राहिली आहे. या संदर्भात आपण तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हा प्रश्न निकालात काढण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून देण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, प्रमोद नागोसे, चंद्रकांत खारकर, प्रतिभा सोनटक्के आदी उपस्थित होते.
