Home Breaking News Chandrapur dist@ news • महिला वाहक कविता झाडेंचा प्रताप : जेष्ठ नागरिकास...

Chandrapur dist@ news • महिला वाहक कविता झाडेंचा प्रताप : जेष्ठ नागरिकास बस मधून भर रस्त्यात उतरविले! •वरिष्ठांकडे तक्रार दाखल! •चौकशीची केली तक्रारदारांने मागणी !

839

Chandrapur dist@ news
• महिला वाहक कविता झाडेंचा प्रताप : जेष्ठ नागरिकास बस मधून भर रस्त्यात उतरविले!
•वरिष्ठांकडे तक्रार दाखल!
•चौकशीची केली तक्रारदारांने मागणी !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:एका महिला बस कंडक्टरने वयोवृद्ध जेष्ठ नागरिकास चक्क बस मधून रस्त्यात उतरुन दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान या बाबतीत वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.या बाबत मिळालेल्या माहितीनुसार असे कळते कि शेणगांव ते चंद्रपूर ही बस आज सकाळी ११:३०वाजताच्या दरम्यान पडोली येथे आली .या बसमध्ये या बसस्थानक वरुन काही शालेय विद्यार्थी व पडोली निवासी जेष्ठ नागरिक पुंडलिक गोठे हे देखील चंद्रपूर कडे येण्यासाठी बसले . आजच्या घडीला त्यांचे वय ७६वर्षाचे आहे.व तसे आधार कार्ड वर नमूद देखिल आहे.एव्हढा सर्व पुरावा उपलब्ध असतांना सुध्दा हे आधार कार्ड चालत नाही.आपण तिकीट काढत नसेल तर खाली उतरा असे महिला कंडक्टर कविता झाडे व वाहन चालक रोकडे यांनी ठणकावून सांगितले.काही वेळ जेष्ठ नागरिक गोठे व चालक वाहक यांच्यात बाचाबाची झाली.शेवटी महिला कंडक्टर यांनी चक्क गोठे यांना भर रस्त्यात बस मधून उतरुन दिले .त्याच परिस्थितीत मानसिक संतुलन बिघडलेल्या गोठे यांनी चंद्रपूर गाठून त्यांनी चंद्रपूर बसस्थानकवर चौकशी कक्षात लेखी तक्रार नोंदविली.घटनेची आपबिती गोठे यांनी प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांना सांगताच लगेच त्यांनी थेट चंद्रपूर बसस्थानक गाठून वाहतूक निरीक्षक अंकित कामतवार यांची भेट घेतली व या प्रकरणात रितसर चौकशी करून वाहक व चालक यांचेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.दरम्यान या प्रकरणात बस मधील एक महिला प्रवासी विद्या लेंडागे ही या घटनेची मुख्य साक्षीदार असून ती या बाबतीत आपले बयान नोंदविण्यास केव्हा ही तयार असल्याचे म्हटले आहे.असे गोठे यांनी आज आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संध्याकाळी सांगितले.