Home Breaking News Ballarpur city@ news • भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या “त्या”समाजकंटकावर तत्काळ...

Ballarpur city@ news • भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या “त्या”समाजकंटकावर तत्काळ कारवाई करा! •आंबेडकर अनुयायींने केली मागणी

192

Ballarpur city@ news
• भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या “त्या”समाजकंटकावर तत्काळ कारवाई करा!
•आंबेडकर अनुयायींने केली मागणी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

बल्लारपूर : येथील आंबेडकरी अनुयानींच्या वतीने मंगळवार दि.२ जानेवारी रोजी भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.विदर्भाच्या भद्रावती शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना केल्याची घटना सोमवार दि.१ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

या ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवर भगवान गौतम बुद्धाची मूर्ती होती. या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना उघडकीस आली. अशा प्रकारच्या घटनांमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात तात्काळ कारवाई करून दोषींना अटक करणे आवश्यक आहे.

सदरहु प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी समस्त आंबेडकरी अनुयायीं बांधवांनी येथील तहसीलदार, व पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना एका निवेदनातून केली आहे.निवेदन देताना
ॲड. मेघा भाले, अभिलाष चूनारकर, अमर धोंगडे, बबलू करमणकर, राजू पडवेकर, शशिकांत निरंजन, अभिषेक केसकर, सिमरन खोब्रागडे, स्वयम धुदे, बादल ताकसांडे, अजित पडवेकर, सचिन अंबादे, गौतम रामटेके, प्रदीप झांबरे, निखिल वनकर, गौतम लोणारे, नम्रता साव, सत्यभामा भाले, दीपक पडवेकर, अनेक आंबेडकर अनुयायी बांधव सहभागी होते