chandrapur dist@ news
• सांस्कृतिक दहशतवाद मुक्ती दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत: सहसंपादक
चंद्रपूर:सावित्री जिजाऊ दशरथोत्सवाच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनांक पाच जानेवारी 2024 रोजी दुपारी एक वाजता मराठा सेवा संघ कार्यालय अखेर वाडी तुकुम चंद्रपूर येथे सांस्कृतिक दहशतवाद मुक्ती दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी रक्तदान करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तथा महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामध्ये एकूण 25 लोकांनी रक्तदान केले.
5 जानेवारी 2004 रोजी पुणे येथे भांडारकर संस्थेवर राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्या प्रकरणात संभाजी ब्रिगेडच्या 72 मावळ्यांनी कारवाई करून निषेध व्यक्त केला होता. ही घटना संभाजी ब्रिगेडच्या वतीने 2005 पासून सांस्कृतिक दहशतवाद मुक्ती दिन म्हणून पाळला जाते. या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 2006 पासून चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. सदरहु रक्तदान शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पवार , जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाकार्याध्यक्ष पल्लवी थेरे, संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष पायल आईनदलवार , उपाध्यक्ष रूपाली धांडे, कोषाध्यक्ष सीमाताई तेकापल्लिवार, उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या आयोजना मागची भूमिका संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष विनोद थेरे यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमदेव थेरे यांनी तर आभारप्रदर्शन चेतन बोबडे यांनी केले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक जेऊरकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिलीप चौधरी, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्यकरिनी सदस्य मीनाक्षी ढोमणे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चना चौधरी, संघटक नीलिमा चटप आदिं प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.