Chandrapur city@ news
• चंद्रपूर जिल्ह्यात ठिय्या आंदोलन सुरूच ; शासनाने नाही घेतली त्यांच्या मागण्यांची अद्याप दखल!
•अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्यात उमटला शासनाविषयी नाराजीचा सूर !
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपूर- शासनाने अंगणवाडी व मदतनिस यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा तसेच ग्रॅज्युटी व पेंशन लागू करण्यात यावी या मागण्यांसाठी त्यांचे राज्यभर गेल्या एक महिन्यांपासून आंदोलन सुरू असून त्यांच्या मागण्यांची अद्याप दखल न घेतल्यामुळे शासना विषयी त्यांच्या मनात नाराजीचा सूर उमटला आहे.याच आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांनी जिल्हाभर ठिय्या आंदोलन सुरू केले .दरम्यान चंद्रपूर कोरपना , जिवती व अन्य तालुक्यात अंगणवाडी संघटनेच्या वतीने आज अंगणवाडी व मदतनिस यांनी धरणे आंदोलन करुन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.चंद्रपूर आंदोलनाचे नेतृत्व शारदा लेनगुरे,संध्या खनके, सुरेखा तितरे , माधूरी कवासे,विमल गावंडे, शोभा राहुरकर, वंदना चव्हाण माया कांबळे, सुषमा बेले ,अल्का नागदेवते,सपना कालिंदे , सविता चहारे ,नंदा जुमडे, सुचिता सोनटक्के, शोभा राहुरकर, कविता भोस्कर यांनी केले. मुंबईत होत असलेल्या आंदोलनासाठी शेकडों अंगणवाडी सेविका व मदतनिस मुंबईकडे रवाना झाले असल्याचे वृत्त आहे.गुजाताई डोंगे, सुनिता डाहूले,लता अहिरकर, सुवर्णा गिरटकर,लता भगत ,कुसुम झाडे, सविता मुळे लक्ष्मी केन्द्रे , शोभा काकडे, सुषमा खिरटकर, ज्योति चौधरी, मीनाताई मुक्के, माधूरी भांडारकर, माया वाटेकर व कल्पना मांदाळे यांनी ह्या ठिय्या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला आहे.