Home Breaking News ▪️शोक संदेश▪️ • चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व...

▪️शोक संदेश▪️ • चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व कायमच हरपलं – आ. किशोर जोरगेवार

147

▪️शोक संदेश▪️
• चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व कायमच हरपलं – आ. किशोर जोरगेवार

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:चंद्रपूर नगरीतील गजानन गावंडे हे एक उत्तम व आदर्श शिक्षक होते. त्यांनी शिक्षणाच्या प्रचार प्रसाराचे महत्वाची भूमिका बजावली होती. शिक्षकी पेशातुन निवृत्त झाल्यावर त्यांनी सामजिक आणि राजकिय क्षेत्रात आपले मोलाचे व भरीव योगदान दिले. सामाजिक कार्याची त्यांना अमाप आवड होती. राजकारणासह ते एक निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने आज शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व कायमच हरपले अश्या शब्दात चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोक संदेशात शोक संवेदना व्यक्त केल्या.

सामाजिक आणि राजकीय जीवनात गावंडे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभायचे. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. अनेक कार्यक्रमा प्रसंगी त्यांची भेट होत असायची यावेळी त्यांच्या बोलण्यातून त्यांच्यात असलेली समाजकार्याची आवड लक्षात यायची. ते नेहमी प्रोत्साहीत करायचे, ते शिक्षकी पेशातून निवृत्त झाले मात्र समाज कार्यातुन ते कधीही निवृत्त झाले नाही.

त्यांच्या अचानक आमच्यातून निघून जाण्याची वार्ता वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. माता महाकाली गावंडे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो अशी प्रार्थनाही आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केलेल्या शोकसंदेशातुन केली आहे.